गणेश कांबळे ( उपसंपादक )

पुणे   ( ता. 25 )+ऐतिहासिक धम्मभूमी देहू रोड बुद्ध विहार कृती समिती धम्मभूमी फेस्टिवल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन हस्ते दिनांक २५डिसेंबर १९५४रोजी तथागत गौतम बुद्ध यांची प्रतिमा बसवण्यात आली होती हा इतिहास पूर्ण मानव जातीला  ज्ञात आहे याच ऐतिहासिक क्षणाचा 71 वा वर्धापन दिन देहूरोड येथे साजरा केला जात असतो. विविध सांस्कृतिक तसेच प्रबोधनपर कार्यक्रम प्रत्येक वर्षी 25 डिसेंबर रोजी साजरे होत असतात. 

त्याचाच एक भाग म्हणून समाजातील तळागाळातील लोकांसाठी अहो रात्र परिश्रम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा अनेक पुरस्कार देऊन सन्मान केला जातो .या कार्यक्रमांमध्ये संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष उत्तम बापू कामठे यांनी बहुजन समाजाच्या उद्धारासाठी सतत झटत असतात ऐतिहासिक धम्मभूमीवरील मराठा आरक्षण परीषदसाठी त्यांनी केलेले कार्य अद्वितीय असे आहे समाजामध्ये आपली कामगिरी एक समाजारत्न म्हणून शोभते म्हणून आपणास ऐतिहासिक धर्मभूमीवर समाज रत्न पुरस्काराने गौरवण्यात येत आहे  असे संयोजक भिमपुत्र टेक्सास दादा गायकवाड विकास प्रणेते ऐतिहासिक धम्मभुमी देहूरोड यांनी  केले.

महाराष्ट्राचे गाण सम्राट आनंद शिंदे व भिमपुत्र टेक्सास दादा गायकवाड यांच्या हस्ते शिवश्री उत्तमबापू कामठे यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला याप्रसंगी प्रबोधक प्रबुद्ध साठे  सिने अभिनेते जॉनी कांबळे व हजारो भीमसैनिक या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *