अजित काळेल ( सातारा जिल्हा संपादक )
सातारा : सामाजिक न्याय, समता आणि बंधुता या तत्त्वांवर कार्यरत असलेल्या दलित पँथर पक्षाच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी आशिष मोरे (रा. वाई , जि. सातारा) यांची नियुक्ती करण्यात आली आहे .
पक्षाचे संस्थापक नामदेव ढसाळ यांच्या विचारांचा वारसा जपत, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. स्वप्निल ढसाळ, महासचिव डॉ. संगीता विष्णू ढसाळ तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इतर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली संघटना अधिक बळकट करण्याची जबाबदारी मोरे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.


पक्षाच्या ध्येय-धोरणांनुसार धर्मस्वातंत्र्य, समता व बंधुता यांच्या आधारे राष्ट्रीय ऐक्य प्रस्थापित करण्यासाठी कार्य करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. शिस्त, सहकार्य आणि स्वावलंबन या तत्त्वांवर आधारित संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याचा निर्धार नव्या जिल्हाध्यक्षांनी व्यक्त केला आहे.
या नियुक्तीबद्दल मोरे यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, त्यांच्या नेतृत्वात सातारा जिल्ह्यात पक्ष संघटना अधिक सक्रिय आणि व्यापक होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, पक्षाचे मुख्य कार्यालय नवी मुंबई येथे असून संघटनात्मक विस्तारासाठी राज्यभर प्रयत्न सुरू असल्याची माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे.


