अजित काळेल ( सातारा जिल्हा संपादक )
आज सांगली जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाची सहविचार सभा सांगली येथे शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात संपन्न झाली .या सभेच्या सभेमध्ये
1) सन २०२५२६ मधील संच मान्यता दुरुस्ती व त्यामधील अट शिथिल करणे
2) संच मान्यता 2025 /26 मधील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन थांबवणे .
3 ) इयत्ता दहावी व बारावी परीक्षा केंद्रावर ऑनलाईन मीटिंगद्वारे होणारे पर्यवेक्षण विद्यार्थ्यांना त्रासदायक असल्याने बंद करणे
4 ) *उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता जिल्ह्यातील माध्यमिक शाळा सकाळ सत्रात घेणे*
5) वेतन पथक कार्यालयाकडे विविध प्रलंबित देयके लवकर मंजूर करणे
6) सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची आपल्या कार्यालयाकडून पाठवण्यात येणारे पेन्शन प्रस्ताव तातडीने मुंबईला पाठवणे
7) मुख्याध्यापक संघटनेकडे प्राप्त झालेल्या आपल्या कार्यालयाकडील विविध तक्रारी अर्जांचा तातडीने निपटारा करणे 8 ) जुन्या पेन्शन योजनेचे घेतलेले प्रस्ताव लवकरच कॅम्पद्वारे पडताळणी करून मे .उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पुढे वर्ग करणे
9)प्रलंबित मुख्याध्यापक मान्यता लवकर देणे
10)मे उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता लवकरात लवकर देणे
11) शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतनातील फरकाचा प्रश्न मार्गी लावणे.
12) कोणाच्याही दबावाला बळी न पडता मुख्याध्यापकांचे पगार बंद करण्याचे आदेश न काढणे 13 ) अनुकंपा भरती बाबत लवकरात लवकर निर्णय घेऊन ते प्रस्ताव मंजूर करणे
14) वेतनेत्तर अनुदानाचे ऑडिट रिपोर्ट वाटप करणे बाबत कॅम्प चे आयोजन लवकरात लवकर करणे
15) थकीत वेतन देयके तपासणी करून लवकरात लवकर वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवणे.
16)दोन यु-डायस असणाऱ्या शाळांच्या संचमान्यता लवकर करून घेणे
17 ) द्विभाषिक शाळांच्या पेंडिंग संच मान्यता लवकर करून घेणे
18) रयत शिक्षण संस्थेतील 20 मुख्याध्यापकांच्या मान्यता लवकरात लवकर देणे
अशा अनेक विषयांवर माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री राजेसाहेब लोंढे यांच्यासमोर सांगली जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री. संजयकुमार झांबरे सर आणि मुख्याध्यापक संघाचे सचिव श्री. संतोष नाईक सर यांनी यांनी सर्व मागण्या विस्तारितपणे सांगून त्या लवकरात लवकर सोडण्यासाठी आपण प्रयत्न करणे असे सांगितले.
यावर माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री राजेसाहेब लोंढे यांनी सर्व मागण्यांवर सकारात्मक चर्चा करून त्या लवकरात लवकर सोडवल्या जातील अशी आश्वस्त केले .
यावेळी माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने मा.शिक्षणाधिकारी यांचे हस्ते मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा अंतर्गत विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळवलेल्या अजितराव घोरपडे विद्यालय,कळंबी व जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळवलेल्या अगस्ती विद्यालय,अगस्तीनगर या शाळांचे सत्कार करण्यात आले .सांगली जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष, सर्व पदाधिकारी तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष,सचिव मोठ्या संख्येने उपस्थित होते अशा प्रकारे सांगली जिल्हा मुख्याध्यापक संघाची सहविचार सभा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाली.

