पुणे  :  (  यवत ) पुणे ग्रामीण जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत दोरगेवाडी येथे एक धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली असून, कुत्र्यामुळे झालेल्या वादातून थेट चाकू हल्ल्यापर्यंत प्रकरण पोहोचल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 18 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी सौ. माधुरी विजय दिवेकर (वय 47) या आपल्या शेतात असताना आरोपींच्या कुत्र्याने त्यांच्या फुलांच्या झाडांचे नुकसान केले. याबाबत त्यांनी आरोपींना कुत्र्यावर नियंत्रण ठेवण्यास सांगितले.

याच कारणावरून वाद निर्माण झाला. आरोपी क्रमांक 2 शुभम ज्ञानेश्वर दिवेकर याने फिर्यादी व त्यांच्या पती विजय दिवेकर यांना बोलावून “तुझ्या शेताचं किती नुकसान झालं ते भरून देतो” असे सांगत अचानक आक्रमक होत शिवीगाळ व मारहाण सुरू केली.

घटनेदरम्यान फिर्यादी भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडल्या असता त्यांनाही ढकलून देण्यात आले. त्यानंतर आरोपी शुभम दिवेकर याने खिशातून लोखंडी चाकू काढून “आज तुला जिवंत ठेवणार नाही” अशी धमकी देत विजय दिवेकर यांच्यावर पोट व पाठीवर सपासप वार केले. या हल्ल्यात विजय दिवेकर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 354/2026 अन्वये BNS कलम 109, 352, 351(2)(3), 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक मारुती मेतलवाड यांनी गुन्हा दाखल करून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुवर्णा गोसावी करत आहेत.
एक साधा वाद कसा गंभीर गुन्ह्यात परिवर्तित होऊ शकतो, याचे हे धक्कादायक उदाहरण असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed