नेताजी खराडे (क्राईम रिपोर्टर महाराष्ट्र राज्य  )

पुणे, दि. 23 एप्रिल 2026 :
पुणे जिल्हा परिषद व पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “गुणवत्ता संवर्धन अभियान” अंतर्गत झालेल्या स्पर्धेत पंडिता रमाबाई मुक्ती मिशन संचलित  मनोरमा मेमोरियल हायस्कूल व जुनिअर कॉलेज, केडगाव या शाळेने तालुकास्तरीय इयत्ता पाचवी ते बारावी गटात प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले.

या उल्लेखनीय यशाबद्दल आयोजित पारितोषिक वितरण समारंभात पुणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी मा. भाऊसाहेब कारेकर यांच्या हस्ते शाळेला सन्मानित करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शाळेच्या उत्कृष्ट कार्याची प्रशंसा करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे विशेष कौतुक केले.

या यशानिमित्त संस्थेचे विश्वस्त मंडळ, संचालक मा. अनिल फ्रान्सिस 0 व पदाधिकारी यांच्या वतीने मुख्याध्यापक, सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे, पंडिता रमाबाई यांच्या 168 व्या जयंतीदिनी हा पुरस्कार प्राप्त झाल्याने या यशाला अधिकच महत्त्व प्राप्त झाले असून, शाळेसाठी हा अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण ठरला आहे.

शाळेच्या या यशामागे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न तसेच विद्यार्थ्यांची मेहनत कारणीभूत असल्याचे मुख्याध्यापकांनी नमूद केले. गुणवत्ता वाढीसाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांमुळेच हे यश शक्य झाल्याचेही त्यांनी सांगितले.

या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, भविष्यातही शैक्षणिक क्षेत्रात नवे मानदंड प्रस्थापित करण्याचा संकल्प शाळेने व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *