उत्तम तांबे  ( रा.जि. संपादक )

माणगाव : रायगड जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती सभा २९ एप्रिल २०२६ रोजी अलिबाग येथील नियोजन मंडळाच्या  इमारतीमध्ये  रायगडचे खासदार
श्रीरंग बारणे व श्री. सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक  संपन्न झाली.   जिल्ह्यातील सर्व आमदार ,  जिल्हाधिकारी सदस्य सचिव असून जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी सदस्य आहेत.

       अनुसूचित जातीचे प्रतिनिधी सदस्य   समितीमध्ये माणगाव तालुक्यातील समाज सेवक  श्री. रवींद्र मोरे यांची अनुसूचित जातीचे प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली . या नियोजीत बैठकीमध्ये श्री. रवींद्र मोरे यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.  यावेळी श्री. रवींद्र मोरे यांनी माणगाव तालुक्यातील विविध समस्यांचे प्रश्न उपस्थित केले.  यामध्ये माणगाव राष्ट्रीय मार्गावरील विविध समस्या मांडल्या.  लोणेरे येथे पल्लवी प्रवीण मोरे हिची निर्घृण हत्या झाली. 

        आरोपीला अटक केल्याबद्दल रायगड पोलिसांना धन्यवाद दिले. आरोपीला जास्तीत जास्त कठोर शिक्षा म्हणून त्याला फाशी व्हावी. पीडित मुलीच्या कुटुंबाला शासनाने सर्व मदत करावी.  समाजकल्याण विभागाने पीडित कुटुंबाला आर्थिक मदत व घरकुल आणि कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी देण्याची मागणी केली आहे .हत्याकांड प्रकरणातील मुलीच्या आई-वडिलांना न्याय मिळण्यासाठी शासनाने सरकारी वकील श्री. प्रसाद पाटील यांना सरकारी खर्चाने नियुक्ती करावे अशी मागणीही त्यांनी केली. 


      खांडपाले बौद्धवाडी येथे जाणारा गाडीमार्ग बंद करून हेतुपुरस्कर काही लोक त्रास देत आहेत. त्याकरीता तेथील दलीत – बौद्धसमाज गेली १० वर्ष सनदशीर मार्गाने न्याय मागत आहे. परंतु त्यांना न्याय मिळत नाही. याकरिता बौद्ध समाज ग्रामस्थ ४ मे, २०२६ रोजी माणगाव तहसील कार्यालया समोर आमरण उपोषण करणार आहेत. त्यांना उपोषण करण्याची वेळ येऊ नये. त्याकरीता शासकीय अधिकारी यांनी कारवाई करावी अशीही श्री. रवींद्र मोरे यांनी मागणी केली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *