अजित काळेल ( सातारा जि. संपादक )
फिजिक्स ही विज्ञानाची अशी शाखा आहे जी आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या चमत्कारांचे स्पष्टीकरण देते,
आपल्या आजूबाजूला अनेक गोष्टी घडतात ..ज्यांचा आपण अंदाज नक्की सांगू शकतो की त्या नंतर काय होईल
उदा. दोरीवर वाळत घातलेले ओले कपडे काही काळानंतर सुकतात..पण त्यातलं पाणी कुठे जाते..त्याला तर काय आपण उकळवत नहीं मग त्याची वाफ का होते? ते आपल्याला माहीत नसते.
आपल्याला ते जाणून घेण्याची इच्छही नसते.
पण असे प्रश्न स्वतःला विचारायला शिका आणि त्याची उत्तरे मिळवा, इंटरेस्ट आपणच निर्माण होईल..
मी खाली काही प्रश्न देतो ते प्रश्न जर आपल्यालाही पडत असतील तर त्यांचे शास्त्रीय उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करा कदाचित आपल्याला नक्की आवड निर्माण होईल..
१. पाण्याला तर कोणताही आकार नसतो पण पाण्याचे थेंब गोलाकार का असतात?
२.केरोसीन डासांच्या अंड्यावर मारले असता त्यांच्यावर काही परिणाम होत नाही तसेच केरोसीन पाण्यातही विरघळत नाही, तरी ज्या पाण्यात डास अंडी घालतात त्या पाण्यावर नगरपालिकेचे लोक केरोसीन चा फवारा का करतात?
३. साध्या पाण्यापेक्षा डिटर्जंट टाकलेल्या पाण्याने कपडे जास्त कसे स्वच्छ होतात?
४.पाणी १००°c ला उकळवल असता त्याची वाफ बनते मात्र उन्हाळ्यात बशीत ठेवलेल्या पाण्याची का वाफ होते.
५. पेंटिंग चा ब्रश किंवा आपले केस पाण्या त बुडविले असता पसरलेले असतात मात्र पाण्याबाहेर काढले तर ते एकत्र का येतात?
६.बल्ब मधील पोकळ जागेत ऑक्सिजन ऐवजी अर्गोन किंवा नायट्रोजन वायू का भरतात?
७. इस्त्री चालू असताना त्यातून इलेक्ट्रिसिटी वाहता असते पण तिला हात लावला तर आपल्याला इलेक्ट्रिक शॉक न बसता गरम चटका का बसतो?
८. प्रकाशाचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा जास्त का असतो?
९. चेंडू वर फेकला तर तो जमिनीवर पडतो पण आकाशातील satellite किंवा चंद्र जमिनीवर का पडता नाही?
१०. वॉशिंग मशीन मध्ये कपडे धुतल्यानतर ते जोरात गोलगोल फिरवले जातात , यामुळे कपडे का सुकतात?
११. झाडाची फांदी जोरात हल्विल्यानंतर फळे खाली कां पडतात?
१२. धुळीने माखलेल्या कपड्याला धूळ चिकटलेली असते मग जोरात कपडा झटकल्यावर धूळ कशी काय निघून जाते?
१३. कराटे चे खेळाडू जेव्हा बर्फाच्या लदिवर फटका मारता त तेव्हा लादी तुटते मात्र आपण मारल्यावर का तुटत नाही?
१४. बंदुकीतून गोळी सुटल्यावर बंदूक मागच्या दिशेने का फेकली जाते?
१५. रॉकेट जेव्हा आकाशात झेपावतो तेव्हा आग तर तिच्या मागच्या दिशेला असते मग ते पुढच्या दिशेला कसे काय जाते?
१६. आपण बोलताना ध्वनी निर्माण करण्यासाठी आपल्या गळ्याचा वापर करतो मात्र एखादी वस्तू जेव्हा दुसऱ्या वस्तूवर आपटत असते तेव्हा का ध्वनी निर्माण होतो?
या भौतिक शास्त्राच्या अभ्यासा मुळेच आपल्याला रामायण महाभारतातील ज्यांगोष्टी काल्पनिक वाटत होत्या त्या प्रत्यक्षात उतरल्या आहेत.
उदा. हस्तीनापुरत असूनही संजयचे कुरूषेत्रावरील घडामोडींचे वर्णन धृतराष्ट्र ला सांगणे – आजकाल टीव्ही वर लाईव्ह प्रक्षेपण बघणे
रावणाने माता सीतेला विमानातून पळवून नेने- आजचा विमान प्रवास
आजच्या युगात Quantum mechanics नावाची फिजिक्स च्या शाखेवर हजारो शास्त्रज्ञ काम करीत आहेत..ज्यामुळे अध्यात्मातील काही गोष्टींचा भविष्यात उलगडा होउ शकेल..आवड असेल तर यावर सुद्धा थोडा गूगल रिसर्च करा.
प्रा सागर संपत शिंदे
( भौतिकशास्त्र विभाग पी व्ही पी महाविद्यालय कवठेमहांकाळ)
