नेताजी खराडे ( क्राईम रिपोर्टर )

मो.नं. :  70281 92140

पुणे : दौंड तालुक्यातील वाखारी येथील पुणे-सोलापूर महामार्गालगत असलेल्या धनश्री लॉजवर यवत पोलिसांनी धाड टाकून अनैतिक शारीरिक व्यापार उघडकीस आणला आहे. या कारवाईत दोन आरोपींविरोधात स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, १० पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.

याबाबत यवत पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 464/2026 अन्वये स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 चे कलम 4, 5 व 6 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलीस हवालदार महेंद्र संभाजी चांदणे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 18 मे 2026 रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास मौजे वाखारी येथील धनश्री लॉजवर पोलिसांनी पंच व बनावट ग्राहकांच्या मदतीने छापा टाकला.

या कारवाईदरम्यान आरोपी प्रदीप बाबू पुजारी (वय 27, रा. जटकल, ता. बैदुर, जि. उडपी, सध्या रा. वाखारी, ता. दौंड) व शहबाझ सिराहा सय्यद (रा. वरंवड, ता. दौंड, जि. पुणे) हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महिलांकडून अनैतिक शारीरिक व्यापार करून घेत असल्याचे निष्पन्न झाले.
छाप्यात पोलिसांनी १ हजार रुपये रोख रक्कम, ड्युरेक्स कंपनीचे ५ कंडोम पाकिटे तसेच लॉजमध्ये येणाऱ्या ग्राहकांच्या नोंदीचे रजिस्टर असा मुद्देमाल जप्त केला आहे. एकूण जप्त मालाची किंमत अंदाजे १ हजार २०० रुपये असल्याचे सांगण्यात आले.

या कारवाईत १० महिलांची सुटका करण्यात आली असून, त्यांना पुढील आवश्यक मदत व संरक्षण देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुवर्णा गोसावी करत असून, पोलीस उपनिरीक्षक मोरे यांनी दाखल अंमलदार म्हणून काम पाहिले. यवत पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *