नेताजी खराडे ( क्राईम रिपोर्टर )
मो.नं. 70281 92140
यवत : यवत पोलीस ठाण्याच्या पथकाने अवैध दारूविक्रीविरोधात कारवाई करत 315 लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू जप्त केली असून या प्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, 1949 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यवत पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 775/2026 अन्वये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, 1949 चे कलम 65 (ख) व (ड) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या प्रकरणी दिनेश भानुदास लोणकर (वय 31), पोलीस कॉन्स्टेबल (बक्कल क्रमांक 440), नेमणूक – यवत पोलीस ठाणे, यांनी फिर्याद दिली आहे. तर धरता रामानंद गुडदावत (वय 39, रा. नांदुर, सहजपूर, ता. दौंड, जि. पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी 2 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास नांदुर (ता. दौंड) गावाच्या हद्दीतील पवार अँग्रो रिसॉर्ट परिसरात छापा टाकला.
या कारवाईदरम्यान आरोपीच्या ताब्यात विक्रीसाठी ठेवलेली 315 लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू आढळून आली. ही दारू 35 लिटर क्षमतेच्या 9 काळ्या-निळ्या प्लास्टिक कॅनमध्ये साठवून ठेवण्यात आली होती.
या कारवाईत पोलिसांनी 31,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपीविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
या गुन्ह्याचे दाखल अंमलदार पोहवा/2054 जगताप असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नंदिवाले करीत आहेत. यवत पोलिसांनी अवैध दारू निर्मिती व विक्रीविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत ही कारवाई केली असून अशा बेकायदेशीर व्यवसायांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
