दिनांक  :  30 / 08 / 2026

रणजित दुपारगोडे   ( महाराष्ट्र प्रतिनिधी )

विवेकानंद प्रियदर्शनी सोशल चॅरिटेबल ट्रस्टची महत्त्वपूर्ण बैठक रविवार, दि. 30 ऑगस्ट 2026 रोजी संस्थापक अध्यक्षा स्मिता बाबरे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. बैठकीत ट्रस्टच्या आगामी सामाजिक, शैक्षणिक व जनकल्याणकारी उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करून विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.


बैठकीस कार्याध्यक्ष राजेंद्र उजागरे, सतीशभाई साळवे, उपाध्यक्ष, सल्लागार अॅड. चांद शेख, अॅड. सुरेंद्र जानराव, रमेश शेळके तसेच नितीन ताटे हे प्रत्यक्ष उपस्थित होते.

यावेळी संस्थेच्या कार्याचा आढावा घेण्यात आला आणि आगामी काळात राज्यभर सामाजिक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed