राजेंद्र उजागरे ( सहसंपादक )

अहिल्यानगर शहरात धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली असून, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याच्या वडिलांची अज्ञात हल्लेखोरांनी निर्घृण हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. शहरातील बालिकाश्रम रोड परिसरात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बालिकाश्रम रोड परिसरात संबंधित व्यक्तीवर अज्ञात हल्लेखोरांनी अचानक हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. घटनेनंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळताच अहिल्यानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा व तपासाची कार्यवाही सुरू केली आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, प्रत्यक्षदर्शी तसेच स्थानिक नागरिकांकडूनही माहिती घेतली जात आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच आमदार संग्राम दादा जगताप यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांकडून घटनेबाबत सविस्तर माहिती घेतली तसेच तपासाच्या प्रगतीची माहिती जाणून घेतली. हल्ल्याचे नेमके कारण आणि आरोपींचा शोध याबाबत पोलिसांकडून सुरू असलेल्या कार्यवाहीची त्यांनी माहिती घेतल्याचे समजते.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या वडिलांची हत्या झाल्याने या घटनेची राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे. हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाला आहे का, कौटुंबिक किंवा अन्य कोणते कारण आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

या घटनेनंतर बालिकाश्रम रोड परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अज्ञात हल्लेखोरांचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
ह

त्येचे नेमके कारण काय, हल्लेखोर किती जण होते आणि या घटनेमागे कोणाचा सहभाग आहे, याचा तपास अहिल्यानगर पोलिसांकडून सुरू आहे. पोलिस तपास पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणातील अधिकृत माहिती आणि आरोपींची ओळख स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed