धनंजय काळे ( महाराष्ट्र प्रतिनिधी )

यवत  : पुणे ग्रामीण जिल्ह्यातील यवत पोलीस ठाण्याच्या पथकाने मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या तपासात छडा लावत एका सराईत चोरट्याला अटक केली असून त्याच्याकडून एकूण ७ चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या वाहनांची अंदाजे किंमत १ लाख १० हजार रुपये इतकी असल्याची माहिती यवत पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

दिनांक ९ जुलै २०२६ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मौजे बोरीपारधी, ता. दौंड, जि. पुणे येथील केडगाव रेल्वे स्टेशनसमोरील मोकळ्या जागेत उभी असलेली काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर आय-स्मार्ट मोटारसायकल चोरीला गेली होती. या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed