नेताजी खराडे ( क्राईम रिपोर्टर )
मो.नं. : 70281 92140
यवत, पुणे ग्रामीण
पुणे ग्रामीण जिल्ह्यातील यवत पोलिसांनी तांब्याच्या केबल चोरीप्रकरणी तातडीने कारवाई करत एका आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून चोरीतील तांब्याच्या केबलसह गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा सुमारे 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरातील औद्योगिक भागात घडणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 सप्टेंबर 2026 रोजी यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे नांदूर (ता. दौंड, जि. पुणे) येथील गिट्स कंपनी मधून सुमारे 40 हजार रुपये किमतीच्या विविध आकारांच्या तांब्याच्या केबलची चोरी झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. घटनेनंतर यवत पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला.

यानंतर पोलिसांनी आरोपीकडून 60 हजार रुपये किमतीची चोरीची तांब्याची केबल तसेच गुन्ह्यात वापरलेली 40 हजार रुपये किमतीची मोटारसायकल जप्त केली. अशा प्रकारे एकूण 1 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून चोरीच्या इतर घटनांशी आरोपीचा संबंध आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी बापूसाहेब धडस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर, पोलीस उपनिरीक्षक मारुती मेटेवाड, पोलीस हवालदार रविंद्र देवकते, रणजीत देवकते, शिरिष जाधव, प्रवीण जगताप, अनिल भुजबळ, सचिन गुंड, दिनेश कुंडले यांनी सहभाग घेतला.
