नेताजी खराडे ( क्राईम रिपोर्टर )
मो.नं. : 70281 92140
ता. दौंड
आज दि. 25.08.2026 रोजी सहशश्त्र महिला प्रभाग संघ, यवत – भांडगाव या ठिकाणी वार्षिक सर्व साधारण सभा व एकल महिला साठी उपजीविका यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे दौंड पंचायत समितीचे सभापती मा. सुखदेव चोरमले साहेब, जिल्हा परिषद सदस्य मा. अविनाश कुदळे साहेब, पंचायत समिती सदस्य मा. सौ. रेखा चौधरी, यवत चे सरपंच मा. समीर दोरगे साहेब, तसेच प्रमुख उपस्थिती मा. आदरणीय अरुण मरभळ साहेब, गट विकास अधिकारी पंचायत समिती दौंड, मा. बालाजी सरवदे साहेब, ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत यवत, मा. सपना करकंडे मॅडम, जिल्हा व्यवस्थापक, जिल्हा परिषद, पुणे, एस एन एस फाउंडेशन संस्था श्री अमोल राठोड सर, प्रोग्राम ऑफिसर मा. अंकित सर, Director Rseti, बँक ऑफ बडोदा, थेऊर फाटा पुणे, Director बँक ऑफ महाराष्ट्र, हडफसर पुणे तसेच

दौंड मधील सर्व MSRLM स्टाफ व प्रभागातील सर्व ग्रामसखी उपस्थित होते. या वार्षिक सर्व साधारण सभेच्या माध्यमातून आलेल्या सर्व निधीचे वाचन करण्यात आले व पुढील काळात कशा प्रकारे विनियोग करता येइल याचे नीयोजन करण्यात आले. मा. सभापती महोदय यांनी महिलांच्या आडीअडचणी जाणून घेऊन त्या नक्कीच काही कालावधी मध्ये सोडवले जातील असे आश्वासन दिले आणि अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन त्यांनी केले.

तसेच मा. BDO साहेबांनी सुद्धा महिलांनी बचतीच्या माध्यमातून एक स्वतःची शाश्वत उपजीविका निर्माण करून आपल्या कुटुंबाची प्रगती करावी. उमेद अभियानाच्या माध्यमातून विविध व्यवसाय उभारणी करावी असे सागितले. व जिल्हा व्यवस्थापक मा. आदरणीय सपना मॅडम यांनी सामाजिक समावेशन मध्ये गट बांधनी, PIP, जेंडर विषयी, परसबाग, दशसूत्री, रेकॉर्ड, ऑडिट, बँक लोन, PMFME, बीज भांडवल, अशा विविध विषयावर सखोल मार्गदर्शन मॅडमनी केले. तसेच तालुका अभियान व्यवस्थापक मा. राणी नन्नावरे मॅडम यांनीही खुप चांगल्या प्रकारे सविस्तर सोप्या भाषेत त्यांनी माहिती सागुण पुढील वार्षिक कालावधी मध्ये कसे चांगले काम होईल हे पहावे.

तसेच तालुका व्यवस्थापक मा. सचिन आटोळे साहेब यांनी ही महिलांना मार्गदर्शन केले. तसेच या कार्यक्रमा मध्ये एकल महिलांची कार्यशाळा आयोजित करून त्यांना मार्गदर्शन करण्यात आले .व एस एन एस फाउंडेशन संस्था यांच्या मार्फत प्रत्येक एकल महिलांना झाडे वाटप करण्यात आले. त्याच प्रमाणे अध्यक्ष व सचिव यांचा तीन वर्ष कालावधी समाप्त झाल्यामुळे या वार्षिक सर्व साधारण सभे मध्ये नवीन अध्यक्ष व सचिव यांची निवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे नियोजन प्रभागातील सर्व ग्रामसखीने केले सूत्रसंचालन सौ. उर्मिला दोरगे ताई, कार्यक्रमाची प्रस्तावना तालुका अभियान व्यवस्थापक मा. राणी नन्नावरे मॅडम यांनी केले आणि आभार प्रदर्शन मा. नंदकिशोर सुरवसे सर यांनी केले.
