शुभांगी वाघमारे 

केडगाव : अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषद व भीमथडी मराठी साहित्य प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पाचवे राज्यस्तरीय भीमथडी मराठी साहित्य संमेलन’ शनिवार, दि. २३ मे २०२६ रोजी बोरमलनाथ मंदिर (चौफुला, केडगाव-बोरीपार्धी, ता. दौंड, जि. पुणे) येथे उत्साहात पार पडले. या संमेलनाचे औचित्य साधून सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पाटस (ता. दौंड) येथील कविता नेताजी खराडे यांना यंदाचा प्रतिष्ठित राज्यस्तरीय ‘भीमथडी प्रशासकीय कार्यगौरव पुरस्कार’ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
  

कविता खराडे या गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासकीय क्षेत्रात अत्यंत सक्रिय आहेत. समाजात वावरताना त्यांनी नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या याच प्रशासकीय व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय आणि आदर्श कामगिरीची दखल घेऊन त्यांना या राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.


  

शनिवारी दुपारी १२:०० वाजता या संमेलनाचे उद्घाटन व पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) संस्थापक-अध्यक्ष महादेव जानकर यांच्या हस्ते या संमेलनाचे दिमाखदार उद्घाटन करण्यात आले, तर ज्येष्ठ साहित्यिक प्रा. फ. मु. शिंदे यांनी संमेलनाध्यक्षपद भूषवले.
या भव्य सोहळ्याला राजकीय, सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रातील अनेक दिग्गज प्रमुख उपस्थित होते.
 

  पुरस्कार स्वीकारल्यानंतर कविता खराडे यांच्यावर संपूर्ण दौंड तालुक्यातून तसेच सामाजिक व प्रशासकीय वर्तुळातून अभिनंदनाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *