नेताजी खराडे  ( क्राईम रिपोर्टर महाराष्ट्र राज्य )

मो.नं. :  70281 92140

दौंड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर मागील अनेक वर्षांपासून अनधिकृतरित्या दगड खाणी सुरू असून त्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी संभाजी ब्रिगेड, पुणे यांच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम मॅडम यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, दौंड तालुक्यातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत दगड खाणी सुरू असून त्यामुळे शासनाचा महसूल बुडत आहे. तसेच या खाणींमुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर आणि शेतीवर गंभीर परिणाम होत आहेत.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे महानगर अध्यक्ष अविनाश मोहिते म्हणाले की, “दौंड तालुक्यातील अनधिकृत दगड खाणी हा अत्यंत गंभीर विषय असून यामध्ये संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष किंवा संगनमत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने तात्काळ सर्व खाणींची चौकशी करून अनधिकृत खाणी बंद कराव्यात तसेच दोषींवर कडक कारवाई करावी. अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.”

तसेच काही ठिकाणी परवानगीपेक्षा जास्त उत्खनन होत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून याबाबतही सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

संभाजी ब्रिगेडने प्रशासनाला इशारा दिला आहे की, या प्रकरणाकडे दुर्लक्ष झाल्यास जनआंदोलन उभारले जाईल.

यावेळी अविनाश अरविंद मोहिते (महानगराध्यक्ष, पुणे), चंद्रशेखरजी घाडगे (जिल्हाध्यक्ष, पुणे), विनोद जगताप जिल्हाध्यक्ष पुणे. निलेश ढगे (सचिव) तसेच संभाजी ब्रिगेडचे इतर प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed