नेताजी खराडे   ( क्राईम रिपोर्टर )

मो. नं. : 7028192140

पाटस : अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष स्व. बिंदूमाधव जोशी यांच्या आशीर्वादाने आणि पुणे जिल्हाध्यक्ष तुषार झेंडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, अखिल भारतीय ग्राहक पंचायत दौंड तालुका कार्यकारिणीची मासिक बैठक रविवार, दि. २५ ऑक्टोबर रोजी पाटस येथील सुभाष अंगण अपार्टमेंटमध्ये अत्यंत आनंदमय वातावरणात पार पडली.

सायंकाळी ५ ते ७ या वेळेत संपन्न झालेल्या या बैठकीत ग्राहकांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.  


   

तालुका कृषी कमिटी प्रमुख सोमनाथ सोडनवर पाटील यांनी तालुक्यातील ग्राहकांच्या समस्या बैठकीत मांडल्या तर ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रसंगी वकिली पेशाचा वापर करून त्यांची बाजू सार्थपणे मांडण्याचा विचार ॲड. शिवाजी केंगार यांनी व्यक्त केला. त्यानंतर पुणे जिल्हा उपाध्यक्ष दिलावर तांबोळी आणि जिल्हा कार्यकारिणी सदस्य राहुल सातपुते यांनी भविष्यातील कामाची दिशा स्पष्ट करत उपस्थितांना मार्गदर्शन केले. तालुकास्तरावर संघटनात्मक कार्य वाढवून जास्तीत जास्त सभासद नोंदणी करणे, ग्राहकांच्या तक्रारींचे योग्य मार्गदर्शनाने निवारण करून त्यांना न्याय मिळवून देणे, दौंड तालुक्याची नवीन कार्यकारिणी तयार करणे, तसेच जुन्या सभासदांना व संचालकांना संपर्क करून पुन्हा मुख्य प्रवाहात आणणे या महत्त्वाच्या बाबींवर तांबोळी यांनी विशेष भर दिला.
   

या बैठकीत तालुका सदस्य ॲड. अक्षय शितोळे देशमुख यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच दौंड तालुक्याच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष दिलावर तांबोळी यांचाही सन्मान करण्यात आला.
   

यावेळी नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष ॲड. नानासाहेब साखरे पाटील यांनी आपल्या भाषणातून सदस्यांना मौलिक सल्ला दिला. “आपापसात कोणतेही क्लेश, मतभेद न ठेवता आणि वादविवाद विसरून सर्वांनी एकमेकांशी प्रेमाने व सलोख्याने वागावे, जेणेकरून संघटना मजबूत होऊन ही ग्राहक चळवळ अशीच अखंडपणे पुढे सुरू राहील,” असे आवाहन त्यांनी केले. बैठकीत उपस्थित सर्वच सदस्यांनी आपापले मनोगत व्यक्त करत संघटनेसाठी एकजुटीने काम करण्याचे आश्वासन दिले.
  

  या बैठकीस पुणे जिल्हा उपाध्यक्ष दिलावर तांबोळी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य राहुल सातपुते, दौंड तालुकाध्यक्ष ॲड. नानासाहेब साखरे पाटील, तालुका कृषी कमिटी प्रमुख सोमनाथ सोडनवर पाटील, ॲड. अक्षय शितोळे देशमुख, तालुका प्रतिनिधी ॲड. शिवाजी केंगार, दै. जनप्रवासचे पत्रकार व तालुका सदस्य मिलिंद शेंडगे, ज्येष्ठ सदस्य व माजी शेती अधिकारी पोपट गुणवरे, महिला प्रतिनिधी ॲड. आरती इंदोरीकर देशमुख, सदस्या वंदना कुदळे यांच्यासह शिवाजी शितोळे, मच्छिंद्र ठोंबरे, अभिजित भागवत, किसन भागवत, अमोल भागवत आदी तालुका प्रतिनिधी उपस्थित होते. अध्यक्ष ॲड. नानासाहेब साखरे पाटील यांनी सर्वांचे मनापासून आभार मानून चहापानाने बैठकीची सांगता केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed