*प्रथम श्रावणी सोमवार निमित्त पांडेश्वर येथे हजारो भाविकांची गर्दी.*
जेजुरी प्रतिनिधी : संदिप रोमण
पुरंदर : पांडवकालीन तीर्थक्षेत्र पांडेश्वर येथे प्रथम श्रावणी सोमवार दिनांक १७ ऑगस्ट २०२६ रोजी पांडेश्वर येथील श्री पांडवेश्वर महादेव मंदिर येथे पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रभरातून आलेल्या भाविकांनी हजारोंच्या संख्येने महादेवाचे दर्शन घेतले.
तीर्थक्षेत्र जेजुरी,मोरगाव माळशिरस आणि भुलेश्वर या देवस्थानच्या मध्यावर असलेल्या शिवमंदिरात अनेक भाविक दर्शनासाठी आले.
नागपंचमी निमित्त श्री शंकर दत्त चिले महाराज भक्त परिवाराकडून महादेवाला पितळी धातूचा भव्य नाग अर्पण करण्यात आला.
पहाटे ०४:०० वाजल्यापासून भाविकांचे अभिषेक सुरू होते.
नंतर शिवलिंगावर फुलांची आरास करण्यात आली आणि सकाळी ठिक ०६:०० वाजता महाआरती करून भाविकांची दर्शनासाठी रांग लागली.
महाआरती नंतर भाविकांना खिचडी प्रसादाची व्यवस्था करण्यात आली.
त्यानंतर दुपारी ठिक 11:30 मध्यान्ह रुद्राभिषेक पुजा करण्यात आली.
दिवसभर भाविकांचे अभिषेक करण्यात आले.दुपारी ठिक 12:30 नंतर महानैवेद्य दाखवून भाविकांना महाप्रसाद सुरू केला.यावेळी दुपारी 12:00 वा.ते 04:00 पर्यंत श्री माऊली बाल संस्कार वारकरी शिक्षण संस्था आंबोडी येथील ह.भ.प.श्री स्वप्निल महाराज काळाणे यांच्या बाल वारकऱ्यांनी सुश्राव्य भजन सेवा दिली.
भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.सायंकाळी ठिक 05:30 वाजता अभिषेक करून सायंकाळची ०६:३० वाजता महाआरती करण्यात आली
रात्री 09:00 नंतर भाविक दर्शन मंदिर गाभारा बंद करण्यात आला.
दिवसभरातील पूजेचे पौरोहित्य व शृंगार पुजा श्री पांडवेश्वर महादेवाचे पुजारी श्री.प्रसाद गुरव, आकाश गुरव व श्री.दिनेश गुरव यांनी केले.
सकाळ पासून सायंकाळ पर्यंतचे खिचडी आणि महाप्रसाद अन्नदान व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था इत्यादीचे नियोजन शिवभक्त श्री.बापूराव चव्हाण आणि श्री.मेघराज चव्हाण यांनी केले.
पांडेश्वर पंचक्रोशी ग्रामस्थांकडून मंदिर शिखरावर आकर्षक विद्युत रोषणाई व भाविकांसाठी मंडप व्यवस्था करण्यात आली होती..
