नेताजी खराडे ( क्राईम रिपोर्टर )

मो.नं. : 70281 92140

दौंड : यवत पोलिसांनी गांजा तस्करीविरोधात कारवाई करत एका महिलेला ताब्यात घेत तिच्याकडून तब्बल १ किलो ९५० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या गांजाची अंदाजे किंमत १ लाख ७ हजार ४०० रुपये असल्याची माहिती यवत पोलिसांनी दिली.

दिनांक ७ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजता यवत पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आवा गाढवे यांना गोपनीय बातमीदारामार्फत गांजा तस्करीबाबत माहिती मिळाली. ही माहिती पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांना देण्यात आली. वरिष्ठांच्या परवानगीने पोलिसांच्या पथकाने मिळालेल्या माहितीची खात्री करून दौंड तालुक्यातील खोपोडी, गरडे वस्ती परिसरात सापळा रचला.

या कारवाईदरम्यान कमल बबन गरडे (वय ६६ वर्षे, रा. खोपोडी, गरडे वस्ती, ता. दौंड, जि. पुणे) ही महिला संशयास्पदरीत्या आढळून आली. पोलिसांनी तिची घरझडती घेतली असता घरामध्ये तिच्या आर्थिक फायद्यासाठी विक्रीच्या उद्देशाने लपवून ठेवलेला गांजा आढळून आला.
पोलिसांनी पंचांसमक्ष गांजा जप्त केला. जप्त केलेल्या अमली पदार्थाचे एकूण वजन १ किलो ९५० ग्रॅम असून त्याची किंमत १,०७,४०० रुपये आहे. गांजासोबत त्याची बिया व भुंग्यासह असलेला अमली पदार्थ पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

या प्रकरणी पोलीस हवालदार संदीप देवकर यांनी यवत पोलीस ठाण्यात सरकारतर्फे फिर्याद दिली असून, गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक आवा गाढवे व पोलीस अंमलदार प्रतिक धिवार करीत आहेत.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव टडस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर, सहायक पोलीस निरीक्षक आवा गाढवे, पोलीस उपनिरीक्षक मारोती मेतलवाड, पोलीस हवालदार संदीप देवकर, महेंद्र चांदणे, अमोल काळे, संदीप करे, पोलीस कॉन्स्टेबल धिरज जाधव, प्रतिक जगताप, मारुती बाराते तसेच महिला पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नाली टिटवे यांनी सहभाग घेतला.

यवत पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील अमली पदार्थांच्या अवैध विक्री व तस्करीविरोधात पोलिसांनी कडक पवित्रा घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *