स्मिता बाबरे ( मुख्य संपादिका )
दि : 22/08/2026
लातूर : विद्यार्थ्यांमध्ये कायद्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासोबतच त्यांच्याशी थेट संवाद साधून सुरक्षितता, सायबर गुन्हे, व्यसनमुक्ती, वाहतूक नियम, महिला व बालकांचे संरक्षण तसेच सोशल मीडियाचा सुरक्षित वापर याबाबत मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने लातूर पोलीस विभागातर्फे पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांच्या संकल्पनेतून दि. 1 ऑगस्ट 2026 पासून ‘पोलीस–विद्यार्थी संवाद’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

दि. 21 ऑगस्ट 2026 पर्यंत या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील 23 पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकारी व दुय्यम अधिकाऱ्यांनी शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेसना एकूण 167 भेटी देत तब्बल 52587 विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला आहे. विद्यार्थ्यांनी मोकळेपणाने प्रश्न विचारावेत आणि पोलिसांशी सुसंवादाचे नाते निर्माण व्हावे, यासाठी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
या उपक्रमाची विशेष बाब म्हणजे पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी स्वतः चार ठिकाणी भेटी देऊन तब्बल 8700 विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेत विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करीत आहेत.
*21 ऑगस्ट रोजी विविध ठिकाणी विद्यार्थ्यांशी संवाद.*
दि. 21 ऑगस्ट रोजी अहमदपूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये विद्यावर्धिनी स्कूल या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री रायबोले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

शिरूर अनंतपाळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये लोक जागृती विद्यालय रापका या ठिकाणी प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक श्री जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पोलीस निरीक्षक श्री चावरे यांनी साने गुरुजी विद्यालय अवंती नगर येथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
पोलीस स्टेशन शिवाजीनगर हद्दीमध्ये पोलीस निरीक्षक श्री पाटील यांनी रामकिशन सोमानी विद्यालय या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
रेनापुर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पोलीस निरीक्षक श्री देडे यांनी तिरुपती माध्यमिक विद्यालय पानगाव या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
पोलीस स्टेशन देवणी हद्दीमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री खोडेवाड यांनी शिवाजी माध्यमिक विद्यालय कवठाळा, व्यंकटेश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सौ अनुसया सोनकवडे उच्च माध्यमिक विद्यालय वलांडी या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच पोलीस उपनिरीक्षक श्री पाटील यांनी विवेक वर्धिनी उच्च माध्यमिक विद्यालय देवणी या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
वाढवणा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पोलीस उपनिरीक्षक क श्री हालशे यांनी जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळा या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

मुरुड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री अंधारे यांनी छत्रपती करिअर अकॅडमी तसेच जिल्हा परिषद शाळा पाच नगर येथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
पोलीस स्टेशन उदगीर शहर हद्दीमध्ये पोलीस उपनिरीक्षक श्री केंद्रे यांनी साने गुरुजी विद्यालय येथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
पोलीस स्टेशन उदगीर ग्रामीण हद्दीमध्ये पोलीस उपनिरीक्षक श्री नरवटे यांनी धोंडू तात्या आश्रम शाळा तसेच द मेघालिस्ट इंग्लिश स्कूल या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
पोलीस स्टेशन लातूर ग्रामीण हद्दीमध्ये पोलीस उपनिरीक्षक श्री वराडे यांनी व्यंकटेश विद्यालय तसेच दयानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी पोलीस आणि विद्यार्थी यांच्यातील संवाद अधिक दृढ करण्याचा हा उपक्रम यापुढेही सातत्याने राबविण्यात येणार असून, ‘सुरक्षित विद्यार्थी–सुरक्षित समाज’ या उद्देशाने लातूर पोलीस विभागाची जनजागृती मोहीम प्रभावीपणे सुरू राहणार आहे.


