हारून शेख ( महाराष्ट्र प्रतिनिधी )

परंडा प्रतिनिधी – गुप्त माहितीच्या आधारे परंडा पोलीसांनी मौजे आसू (परंडा ता.)येथील एका शेतातील अफूच्या शेतीवर शुक्रवारी दि.13 रोजी संध्याकाळच्या सुमारास धाड टाकून कारवाई करण्यात आली पोलिसांनी सुमारे 1 किलो 650 ग्रॅम अफूचे झाडाचे अंदाजे किंमत 19 हजार 590 रुपये 
किंमतीचे लहान माठी झाडे जप्त केली आहे. 

याप्रकरणी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मौजे आसू येथे जेजेराम जाधव यांच्या शेतात अफूची लागवड केली असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर परंडा पोलिसांच्या पथकाने धाड टाकली. मिळालेली माहिती खरी असल्याचे यावेळी दिसून आले. 


याठिकाणी कांद्याच्या अंतर्गत अफूची झाडे लावल्याचे आढळून आले.धाराशिव येथून फाॅरेंसिक लॅबचे पथक शेतात दाखल झाले. लहानमोठी अशी सुमारे 36 अफूची झाडे लावल्याचे दिसून आले. या कारवाईत सुमारे 1 किलो 650 ग्रॅम अफू जप्त करण्यात आली. दरम्यान अफू शेतीचा प्रकार उघडकीस आला आहे.
या कारवाईत परंडा पोलीस निरीक्षक आसाराम चोरमुले, उपनिरीक्षक बाळासाहेब खरात, शिवाजी राऊत, दिलीप पवार, सुर्यजित जगदाळे,साधु शेवाळे तसेच महसूलचे मंडाळाधिकारी आबासाहेब सुरवसे, ग्राम महसूल अधिकारी शिंदे, पोलीस पाटील इतापे आदी उपस्थित होते.वारिल प्रकरणाचा गुन्हा परंडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
या घटने मुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *