नेताजी खराडे ( दौंड तालुका प्रतिनिधी )

मो. नं.7028192140

पाटस : दौंड तालुक्यातील निर्भीड पत्रकार आणि मानवी हक्कांसाठी काम करणारे सचिन आव्हाड यांना ‘ऑल जर्नालिस्ट फ्रेंड सर्कल’ या संघटनेच्या वतीने यावर्षीचा राज्यस्तरीय पत्रकार प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. लातूर येथील परिवर्तन सभागृहात पार पडलेल्या एका विशेष सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा गौरव प्रदान करण्यात आला.
    या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून अण्णारावजी पाटील, ऑल जर्नालिस्ट फ्रेंड सर्कलचे अध्यक्ष यासीन पटेल आणि पत्रकारिता क्षेत्रातील इतर ज्येष्ठ मान्यवर उपस्थित होते. यावेळी सचिन आव्हाड यांच्यासह राज्यातील एकूण नऊ निवडक पत्रकारांचा त्यांच्या विशेष कार्याबद्दल गौरव करण्यात आला.
    सचिन आव्हाड हे मागील दहा वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेत सक्रिय आहेत. केवळ बातम्या प्रसिद्ध न करता, समाजातील पीडित आणि वंचितांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांच्या निर्भीड लेखणीमुळे अनेकदा प्रशासनाला जनहिताचे निर्णय घेणे भाग पडले आहे. त्यांच्या याच निस्पृह पत्रकारितेची दखल घेत संपूर्ण पुणे जिल्ह्यातून त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
    सचिन आव्हाड यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल दौंड तालुका तसेच पुणे जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे. अन्यायाविरोधात सातत्याने आवाज उठवणाऱ्या एका झुंजार पत्रकाराला हा सन्मान मिळाल्याने सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे.

चौकट : “पत्रकारिता हे केवळ उपजीविकेचे साधन नसून समाजातील अन्यायाविरोधात लढण्याचे प्रभावी शस्त्र आहे. हा पुरस्कार माझ्या जबाबदारीची जाणीव अधिक प्रगल्भ करणारा आहे.” — सचिन आव्हाड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed