नेताजी खराडे ( क्राईम रिपोर्टर महाराष्ट्र राज्य )
मो.नं. : 70281 92140
दौंड : केडगाव मध्ये धर्मध्वजाची भव्य स्थापना
दौंड-केडगाव मध्ये दिनांक 2 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता धर्म ध्वजाची स्थापना मोठ्या उत्साहात करण्यात आली हा ध्वज नगर जिल्ह्यानंतर प्रथमच पुणे जिल्ह्यामध्ये दौंड तालुक्यात केडगाव या ठिकाणी स्थापन करण्यात आला.

या कार्यक्रमाला गावातील नागरिक तरुण मंडळ तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते विधिवत पूजा व म मंत्रचारात धर्म ध्वजाची स्थापना करण्यात आली त्यावेळी परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते या कार्यक्रमासाठी महंत लक्ष्मीनाथ व गुरुवर्य राहुल महाराज राऊत यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला .
या कार्यक्रमासाठी दौंड चे आमदार राहुल कुल यांनीही हजेरी लावली त्यांनी आपल्या भाषणात ध्वजाचे महत्व व धर्म रक्षण याविषयी नागरिकांना महत्त्व पटवून दिले या कार्यक्रमासाठी आप्पासाहेब हडाळ किरण देशमुख म्हणजे शेळके उपसरपंच भाऊसाहेब शेलार दत्ता आबा शेळके विठ्ठल उर्फ नाना शेळके निलेश कुंभार अशोक हंडाळ हे मान्यवर उपस्थित होते.

