नेताजी खराडे   ( क्राईम रिपोर्टर महाराष्ट्र राज्य )

मो.नं. :  70281 92140

दौंड (पुणे)  : पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघाताची घटना समोर आली असून या अपघातात एका 24 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर दोघे जखमी झाले आहेत. ही घटना 2 एप्रिल 2026 रोजी सकाळी सुमारे 9.45 वाजण्याच्या सुमारास दौंड तालुक्यातील बोरीपारधी गाव हद्दीत, धायगुडेवाडी येथील जगदंब हॉटेलसमोर घडली.
     याबाबत यवत पोलिस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 293/2026 नुसार भारतीय न्याय संहिता (BNS 2023) अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
      फिर्यादी सनी नरबाल राजपूत (वय 19, रा. कोयाळी, ता. खेड, जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी भागवत बालाजी धर्मकर (रा. सावरगाव निपाणी, ता. कंधार, जि. नांदेड) हा त्याच्या ताब्यातील टेम्पो (MH 42 BF 5808) भरधाव वेगात व बेफिकिरीने चालवत होता.
पुण्याकडून सोलापूरकडे जात असताना अचानक टेम्पो वळविल्याने मागून येणाऱ्या तीन केटीएम मोटारसायकलींना जोरदार धडक बसली. या मोटारसायकली अनुक्रमे:
सेहवाग नरबाल राजपूत (वय 24)
इशांत विनोद राजपूत
विकेश कमलेश राजपूत
यांच्या ताब्यात होत्या.
          या भीषण धडकेत सेहवाग नरबाल राजपूत यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. तर इशांत व विकेश हे दोघे गंभीर व किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
तसेच तिन्ही मोटारसायकली आणि टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पोलिस कारवाई:
         या प्रकरणी संबंधित आरोपीविरोधात बेदरकार वाहन चालवणे, निष्काळजीपणा व इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार वलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रेपोसई रजपुत करत आहेत.
        पुणे-सोलापूर महामार्गावर पुन्हा एकदा वेग आणि निष्काळजीपणामुळे एका निष्पाप तरुणाचा जीव गेला आहे. वाहतूक नियमांचे पालन न केल्यास अशा दुर्घटना टाळता येणार नाहीत, हे या घटनेतून स्पष्ट होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed