नेताजी खराडे क्राईम (  रिपोर्टर महाराष्ट्र राज्य‌ )

पाटस : पुणे ग्रामीण जिल्ह्यातील यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. यवत पोलीस ठाणे यांच्या पथकाने पाटस परिसरात छापा टाकत एम.डी. (मेफेड्रोन) या अमली पदार्थासह एका तरुणाला अटक केली आहे.
घटनेचा तपशील असा की :

दि. २३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास पाटस येथील पाटस ते कुरकुंभ जाणाऱ्या रस्त्यावर, वाडजे खंडकवासला कॅनॉलजवळ संशयित हालचाली आढळून आल्या. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संशयिताला ताब्यात घेतले.
आरोपीची माहिती :

आदित्य अंकुश माने (वय २४ वर्षे, रा. पाटस, ता. दौंड, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
जप्त माल :
आरोपीकडून सुमारे ३७,८०० रुपये किंमतीचा १.८९ ग्रॅम एम.डी. (मेफेड्रोन) हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. हा पदार्थ आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे २०,००० रुपये प्रति ग्रॅम दराने विकला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गुन्ह्याची नोंद :
सदर प्रकरणी एन.डी.पी.एस. कायदा १९८५ अंतर्गत कलम ८ (c), २२ (a) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कारवाई व तपास :
ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक मारुती मेतलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय कोळे करत आहेत.
पोलीसांचे आवाहन :

अमली पदार्थांच्या विक्री व सेवनामुळे समाजावर गंभीर परिणाम होत असल्याने नागरिकांनी अशा प्रकारच्या संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
      महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 – “शोध सत्याचा, त्याला वास्तवाची धार”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed