स्मिता बाबरे ( मुख्य संपादिका )
दापका राजा : या. मुखेड जि. नांदेड
महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 मध्ये उपसंपादक पदावर कार्यरत असलेले गुलाब हबीबसाहब शेख यांच्याविरोधात गंभीर स्वरूपाच्या तक्रारी समोर आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर संस्थेकडून तत्काळ कारवाई करत गुलाब शेख यांना निलंबित करण्यात आले आहे. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली असून, चौकशीअंती पुढील कठोर निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.
संस्थेच्या शिस्त आणि पारदर्शकतेच्या धोरणानुसार कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकाराला थारा दिला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे संस्थेच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अधिक माहितीसाठी राहा जोडलेले — महाराष्ट्र पोलीस न्यूज 24
“शोध सत्याचा, त्याला वास्तवाची धार”
