नेताजी खराडे ( क्राईम रिपोर्टर )
मो.नं. : 70281 92140
यवत : आज दिनांक 06/05/2026 रोजी सकाळी 11.00 वाजता यवत पोलीस स्टेशन अंकित पाटस पोलीस दूरक्षेत्र येथे यवत पोलिस स्टेशनला मागील बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेले मोटार सायकल – 293, तीन चाकी / चार चाकी वाहने – 16 अशा बेवारस वाहनांचा लिलाव पार पडला.

यवत पोलीस स्टेशन कडून विहित नियमावलीनुसार बेवारस वाहनांचा लिलाव कामी दैनिक वृत्तपत्रांद्वारे आवाहन/ सूचित करण्यात आले होते. त्यातून एकूण 31 भंगार व्यावसायिक/ स्क्रॅप डीलर हे लिलाव मध्ये सहभागी झाले होते.

सदर लिलाव प्रक्रिया कामी महसूल विभाग दौंड तर्फे श्रीमती खाडे मॅडम मंडळ अधिकारी येथे, उपप्रादेशिक परिवहन विभाग बारामती तर्फे श्री रजत कणवाटे, तसेच पत्रकार आणि फोटोग्राफर यांचे उपस्थितीत पारदर्शकपणे पार पडला आहे. त्यामध्ये वाखारी येथील पूना सेल्स कॉर्पोरेशन करिता फिरोज शेख यांनी सर्वोच्च 9,35,000/- बोली लावून हा लिलाव खरेदी केला.

सदर लिलाव प्रक्रिया मा. श्री. संदीप गिल्ल पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, मा. श्री. गणेश बिरादार, अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग, मा. श्री. बापूराव दडस उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड उपविभाग, मा. श्री. नारायण देशमुख पोलीस निरीक्षक यवत पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री विजय कोल्हे, मुद्देमाल कारकून पोलीस हवालदार सचिन साळुंखे, पोलीस हवालदार संतोष खरटमल, पोलीस हवालदार रवींद्र मोहिते यांनी नियोजन व कार्यवाही कामकाज पाहिले आहे.

