अजित काळेल सा.जि. संपादक )

सातारा  : भुईंज येथे अत्याधुनिक सुविधा आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा संकल्प घेऊन सुरू करण्यात आलेल्या “त्रिशा वेलणेस & फिटनेस सेंटर” चे भव्य उद्घाटन नुकतेच उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. परिसरातील महिला, युवक-युवती, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

आरोग्य आणि फिटनेस यांना केंद्रस्थानी ठेवून सुरू करण्यात आलेल्या या सेंटरमध्ये वजन कमी किंवा वाढवण्यासाठी विशेष मार्गदर्शन, योगा प्रशिक्षण, फिटनेस ट्रेनिंग, आरोग्यविषयक सल्ला तसेच ऑनलाईन आणि ऑफलाईन वर्कआउटच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. निरोगी शरीर, सकारात्मक विचार आणि संतुलित जीवनशैली घडविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

उद्घाटनप्रसंगी जागतिक आरोग्य सल्लागार राम घुले सर आणि सोमनाथ कांबळे सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीत आरोग्य जपणे ही काळाची गरज बनली आहे. युवक, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांनी नियमित व्यायाम, योग्य आहार आणि फिटनेसकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.”

तसेच “त्रिशा वेलणेस & फिटनेस सेंटर” हे भुईंज परिसरातील नागरिकांसाठी आरोग्य, फिटनेस आणि सकारात्मक जीवनशैलीचे प्रभावी केंद्र ठरेल, असा विश्वासही मान्यवरांनी व्यक्त केला.

दरम्यान, वजन कमी अथवा वाढवण्यासाठी तसेच आरोग्यविषयक मार्गदर्शनासाठी आरोग्य सल्लागार अजित काळेल यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले असून, इच्छुकांनी मो. 8999363367 वर संपर्क साधावा, असे आयोजकांकडून सांगण्यात आले.( सा. जिल्हा संपादक  )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *