नेताजी खराडे. ( क्राईम रिपोर्टर )
मो.नं. : 70281 92140
पाटस ( दौंड तालुका ) : येथील भीमा-पाटस सहकारी साखर कारखाना पुन्हा एकदा मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कारखान्याकडे जमा असलेल्या अनेक वर्षांच्या मुदत ठेवी आणि त्यावरील व्याज, अशी मिळून तब्बल ४२,७९,०६,०५७ रुपये (सुमारे ४३ कोटी रुपये) एवढी प्रचंड रक्कम कारखान्याने अद्याप सभासदांना परत केलेली नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
याविरोधात आता कारखान्याचे सभासद आणि शेतकरी प्रचंड आक्रमक झाले असून त्यांनी प्रशासनाविरोधात एल्गार पुकारला आहे.
कारखान्याचे सभासद शिवाजी ढमाले यांनी या मनमानी कारभाराचा पर्दाफाश केला आहे. दरवर्षी शेतकरी कारखान्याला जो ऊस पुरवतात, त्या उसाच्या प्रति टनामागे ठराविक रक्कम कपात करून ती कारखान्याकडे ‘कोजन प्रकल्प परतीची ठेव’ किंवा ‘रुपांतरिय ठेव’ म्हणून वर्ग केली जाते. ही रक्कम आणि त्यावर मिळणारे व्याज कायदेशीररित्या मुदत संपल्यावर सभासदांना मिळणे बंधनकारक आहे. मात्र, वर्षानुवर्षे ही रक्कम कारखान्याने स्वतःकडेच दाबून ठेवली आहे.
