उत्तम तांबे  ( रा.जिल्हा संपादक )

मो.नं. : 9049040622

माणगाव  ( रायगड जिल्हा ): बौद्धजन पंचायत समितीचे सभापती तथा रिपब्लिकन सरसेनानी – आनंदराज आंबेडकर तसेच भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष – भीमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली अनुसूचित जाती आरक्षणामधील ” अ ब क ड ” उपवर्गीकरणाच्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी 30 जून 2026 रोजी आंबेडकरी समाजाच्या वतीने मेट्रो सिनेमा ते विधानभवन दरम्यान विराट मोर्चा काढण्यात आला . १ ) अनुसूचित जाती (एस .सी ) अंतर्गत उपवर्गीकरण करून समाजात फूट पाडण्याचे षडयंत्र महाराष्ट्र सरकारने त्वरित थांबवावे . २ ) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनात्मक आरक्षणाची मूळ चौकट अबाधित राहावी . ३ ) माजी न्यायमूर्ती अनंत बदर समितीचा अहवाल सार्वजनिक करावा . ४ ) अनुसूचित जातींचा नोकऱ्यांमधील अनुशेष तात्काळ भरावा . ५ )  पदोन्नती मधील आरक्षण लागू करावे . ६ ) सामाजिक न्याय विभागाचा निधी इतरत्र न वळवता केवळ अनुसूचित जातींच्या कल्याणकारी योजनांसाठी वापरावा या महत्त्वपूर्ण मागण्यांबरोबर ही लढाई , हा संघर्ष केवळ एका समाजाचा नसून संविधान , सामाजिक न्याय ,समता आणि बंधुता वाढविचा संघर्ष आहे .

असे यावेळी सरसेनानी – आनंदराज आंबेडकर यांनी आपले संघर्षमय मत व्यक्त केले . या सदर महामोर्चात भारतीय बौद्ध महासभेचे ब्रिगेड शाखा पदाधिकारी , बबनराव घोलप , राष्ट्रीय चर्मकार संघाचे अध्यक्ष – राजकुमार बडोले , ॲड . सुरेश माने , राष्ट्रीय चर्मकार संघाचे – बाबुराव माने , राजाराम पाटील , डॉ . बाबा कांबळे , शरद शिर्के ‘ राहुल जाधव तसेच रायगड जिल्ह्यातील बौद्धजन पंचायत समिती माणगाव तालुका अध्यक्ष – रवींद्र मोरे , प्रमुख सल्लागार – ॲड . नरेश जाधव , सहसचिव – रणजीत मोहिते ‘ शाखा क्रमांक एक सचिव – विनोद मोरे ,शाखा क्रमांक आठ अध्यक्ष – संदेश साळवी , शाखा क्रमांक चार सचिव – मुकेश सकपाळ या मान्यवरांसह आझाद मैदानामध्ये निळा जनसागर लोटला होता .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed