हारून शेख  ( महाराष्ट्र प्रतिनिधी  )


धाराशिव – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी यांना रमाई आवास घरकुल योजनेच्या ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना सन 2025-26 व सन 2026- 27 मागील दोन वर्षापासून लाभ मिळत नसल्याबाबत निवेदन देण्यात आले


      

वरील विषयी की धाराशिव जिल्ह्यातील सन 2025 26 व 202627 चे रमाई आवास घरकुल योजनेच्या नवीन लाभार्थ्यांना शासनाची मंजुरी असूनही घरकुलाचा पहिला हप्ता देण्यात येत नाही घरकुल योजनेची शासनाचे मंजुरी असूनही बऱ्याच लाभार्थ्याचे बांधकाम खोळंबले आहे. तसेच दिवसेंदिवस महागाईमुळे बांधकामाचे साहित्य महाग होत असल्याने त्यांची आर्थिक स्वरूपाची झळ लाभार्थ्यांना सोसावी लागत आहे.तरी शासनाने या गंभीर बाबीची दखल घेऊन पहिला हाप्ता तात्काळ द्यावा अशी मागणी निवेदना द्वारे करण्यात आली आहे.

यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष विद्यानंद बनसोडे,जिल्हा उपाध्यक्ष, रणजीत गायकवाड ,जिल्हा सरचिटणीस सिद्धार्थ ओव्हाळ, जिल्हा कार्याध्यक्ष सोमनाथ गायकवाड, तालुकाध्यक्ष भालचंद्र कठारे,अरुण लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब माने, समाधान सरवदे,अंगुल माने, अश्रुबा शितोळे ,रोहित ओव्हाळ यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *