फिरोज सय्यद ( नांदेड जिल्हा प्रतिनिधी )
नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत माहूर तालुका येथील सिंदखेड पोलीस स्टेशन पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ७ लाख ४० हजार ७०० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखूसाठा, तसेच वाहतुकीसाठी वापरलेली कार जप्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २० ऑगस्ट २०२६ रोजी सिंदखेड पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, ‘मौ सारखणी’ वनोउपज तपासणी नाका येथे एका कारमधून (MH-29 CR-0155) अवैध गुटख्याची वाहतूक केली जात आहे. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन वाहनाची तपासणी केली असता, त्यात १ लाख ४० हजार ७०० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व ६ लाख रुपयांची कार, असा एकूण ७ लाख ४० हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.
या प्रकरणी प्रफुल भालचंद्र येन्नावार (वय ३८, रा. पुसद) आणि निवृती धर्माजी अल्लडवार (वय ४९, रा. यवतमाळ) या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. सिंदखेड पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.
ही कारवाई मा. डॉ. नीलाभ रोहन, पोलीस अधीक्षक, नांदेड, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक/संतोष जोंधळे, पोलीस अंमलदार आकाश सावंत, कदम, वानखेडे व होमगार्ड सर्व नेमणुक सिंदखेड पोलीस स्टेशन यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी फिरोज सय्यद
