नेताजी खराडे ( क्राईम रिपोर्टर )
मो.नं. : 70281 92140
दौंड : येथील गोपाळवाडी रोडवरील विजय कॉम्प्लेक्समध्ये ‘रॉयल दरबार बिर्याणी हाऊस’ चा भव्य शुभारंभ काल अत्यंत उत्साहात आणि थाटामाटात पार पडला. या उद्घाटन सोहळ्याला परिसरातील नागरिकांनी आणि बिर्याणी प्रेमींनी मोठी गर्दी केली होती.

कार्यक्रमाचे औचित्य साधून दौंड नगरपरिषदेचे गटनेते जीवराज गिरजाप्पा पवार यांच्या हस्ते फित (रिबीन) कापून या नवीन दालनाचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले. आई-वडिलांच्या शुभआशीर्वादाने सुरू झालेल्या या नवीन उद्योगाला उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमा दरम्यान परिसरातील नागरिक आणि खवय्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. उद्घाटनानिमित्त आलेल्या सर्व उपस्थितांसाठी अत्यंत उत्कृष्ट दर्जाची व्हेज आणि नॉनव्हेज बिर्याणी तयार करण्यात आली होती. बिर्याणीच्या शाही आणि अविस्मरणीय स्वादाने उपस्थितांची मने जिंकली. सर्वांनी अन्नाच्या चवीचे मनापासून कौतुक केले.

आयोजक लौकिक गायकवाड आणि साबीर आली यांचे उपस्थितांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी उदंड शुभेच्छा दिल्या.
‘रॉयल दरबार बिर्याणी हाऊस’मुळे आता दौंडकरांना एकाच छताखाली शाही आणि लज्जतदार बिर्याणीचा उत्तम पर्याय उपलब्ध झाला आहे.
