पंकज सरोदे ( महाराष्ट्र प्रतिनिधी )
आगामी गणेशोत्सव २०२६ च्या अनुषंगाने ओतूर पोलीस स्टेशनकडून रूट मार्च आगामी गणेशोत्सव २०२६ च्या अनुषंगाने सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याच्या दृष्टीने ओतूर पोलीस स्टेशनच्या वतीने आज दिनांक ११/०९/२०२६ रोजी सायंकाळी ५ः१५ ते ०६ः३० वाजेपर्यंत ओतूर शहरातून रूट मार्च घेण्यात आला.

सदर रूट मार्च दरम्यान गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील संवेदनशील ठिकाणे, प्रमुख मार्ग तसेच गर्दीची ठिकाणे यांची पाहणी करण्यात आली. सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस दलाची उपस्थिती व सज्जता याबाबत नागरिकांना विश्वास देण्यात आला.

त्यानंतर सायंकाळी ०५:२० ते ०६:३५ वाजेपर्यंत ओतूर पोलीस स्टेशन हद्दीत संभाव्य आपत्कालीन परिस्थिती, जमाव नियंत्रण, कायदा व सुव्यवस्था राखणे तसेच परिस्थितीवर तात्काळ नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने पोलीस दलाची कार्यक्षमता व तयारी तपासण्यात आली.

सदर रूट मार्च मध्ये ओतूर पोलीस स्टेशनचे ०३ अधिकारी व २० पोलीस अंमलदार तसेच जुन्नर उपविभागातून ०१ RCB प्लाटून सहभागी झाली होती.
आगामी गणेशोत्सव काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये, सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच नागरिकांनी गणेशोत्सव शांततेत, उत्साहात व सुरक्षित वातावरणात साजरा करावा, या उद्देशाने पोलीस प्रशासनाकडून आवश्यक ती पूर्वतयारी व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत.
सदर रूट मार्च सुरळीतपणे पार पडला.

