१५ ऑगस्ट २०२६

दीर्घकाळाची निष्कलंक, उल्लेखनीय व कर्तव्यनिष्ठ सेवा ठरली गौरवाची मानकरी.

                 पोलीस दलात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे, नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे, गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवणे तसेच पोलीस दलाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी दीर्घकाळ उल्लेखनीय, निष्ठेने व गुणवत्तापूर्ण सेवा बजावणाऱ्या लातूर जिल्हा पोलीस दलातील एकूण २१ पोलीस अधिकारी व अंमलदारांची अति उत्कृष्ट सेवा पदक, उत्कृष्ट सेवा पदक व विशेष सेवा पदकासाठी निवड करण्यात आली आहे.

                  पोलीस अधिकारी व अंमलदारांनी बजावलेल्या प्रदीर्घ, उल्लेखनीय व कर्तव्यनिष्ठ सेवेची दखल घेत मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने सदर पदके जाहीर करण्यात आली आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यावर लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते या गुणवंत पोलीस अधिकारी-अंमलदारांचा गौरव करण्यात आला. हा सन्मान संबंधित अधिकारी-अंमलदारांच्या कर्तृत्वाची पोचपावती असून, संपूर्ण लातूर जिल्हा पोलीस दलासाठी हा अभिमानाचा व प्रेरणादायी क्षण ठरला आहे.

*अति उत्कृष्ट सेवा पदक*

१. श्री. गजानन लक्ष्मीकांत भातलवंडे (उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग उदगीर, जि. लातूर.)

२. श्री. मुक्तार इब्राहिम शेख


(पोलीस उपनिरीक्षक, बी.डी.डी.एस. पथक, लातूर.)

३. श्री. अरुण रुक्माजी डोंगरे


(ग्रेड पोलीस उपनिरीक्षक, पी.आर.ओ. शाखा, लातूर.)

४. श्री. परमेश्वर बाबुराव अंभोरे


(वाचक शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर.(

५. श्री. मोहन श्रीपती धुमाळ


(पोलीस ठाणे औसा.)

*उत्कृष्ट सेवा पदक*

६. श्री. कुमार भिकाजी चौधरी


(उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग औसा, जि. लातूर.)

७. श्री. सुधाकर मुरलीधर बावकर (पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, लातूर.)

८. श्री. विनायक सौदागर माने


(सहाय्यक पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, लातूर.)

९. श्री. रामदास बलभीम नाडे


( ग्रेड  पोलीस उपनिरीक्षक, पोलीस ठाणे मुरुड .)

१०. श्री. प्रवीण जीवनराव मोटेगांवकर (लघुलेखक शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर.)

११. श्री. दत्तात्रय माधव शिंदे


(स्थानिक गुन्हे शाखा, लातूर.)

१२. श्री. बालाजी पंढरीनाथ जाधव (पोलीस ठाणे विवेकानंद चौक, लातूर.)

१३. श्री. मोहन गोराव सुरवसे


(स्थानिक गुन्हे शाखा, लातूर.)

१४. श्री. नानासाहेब आनंद भोंग


(वाचक शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर.)

१५. श्री. माधव लक्ष्मण बिलपाटे


(स्थानिक गुन्हे शाखा, लातूर.)

१६. श्री. राजेश विठ्ठलराव कंचे


(स्थानिक गुन्हे शाखा, लातूर.)

१७. श्री. परमेश्वर जनक देकणे


(वाचक शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर.)

१८. श्री. प्रकाश नामदेवराव जाधव (वाचक शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर.)

१९. श्री. अभिजीतसिंह नंदकिशोरसिंह चव्हाण


(वाचक शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर.)

*विशेष सेवा पदक*

२०. श्री. अजय माधवराव पाटील


(पोलीस उपनिरीक्षक, पोलीस ठाणे MIDC.)

२१. श्री. अक्षय माधवराव पाटील


(पोलीस उपनिरीक्षक, पोलीस ठाणे देवणी.)

*कर्तव्यनिष्ठ सेवेचा अभिमानास्पद गौरव.*

                  लातूर जिल्हा पोलीस दलातील या अधिकारी व अंमलदारांनी आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात कायदा व सुव्यवस्था, गुन्हे प्रतिबंध व तपास, नागरिकांची सुरक्षितता, संवेदनशील परिस्थितीतील पोलीस बंदोबस्त तसेच पोलीस प्रशासनाच्या विविध जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडल्या आहेत.

                   विशेषतः अति उत्कृष्ट सेवा पदकासाठी निवड झालेल्या अधिकारी-अंमलदारांची ३० ते ३९ वर्षांपर्यंतची प्रदीर्घ सेवा, उत्कृष्ट सेवा पदकासाठी निवड झालेल्या अधिकारी-अंमलदारांची १७ ते ३३ वर्षांपर्यंतची उत्कृष्ट सेवा, तसेच गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात खडतर सेवा बजावणाऱ्या दोन पोलीस अधिकाऱ्यांना मिळालेला विशेष सेवा पदकाचा सन्मान, त्यांच्या कर्तव्यनिष्ठेची, धैर्याची आणि सेवाभावाची पावती ठरला आहे.

               पदक प्राप्त केलेल्या सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांचे पोलीस अधीक्षक, लातूर श्री. अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक, लातूर श्री. मंगेश चव्हाण यांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील सेवावाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *