नेताजी खराडे ( क्राईम रिपोर्टर )

मो.नं. :  70281 92140

नशाबंदी मंडळ पुणे जिल्हा संघटक व पुणे विभागीय प्रमुख म्हणून डॉ. बापुराव फडके यांची नियुक्ती.

नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्यच्या महाराष्ट्रातील ३६ जिल्हा संघटकाचे संवाद, समन्वय आणि वार्षिक नियोजन बैठकीचे आयोजन शुक्रवार ५ जून ते ७ जून पर्यंत यात्री निवास, सेवाग्राम आश्रम,जिल्हा वर्धा  याठिकाणी आयोजित करण्यात आली. या ठिकाणी संघटकाना २०२६-२७ ची मान्यता तसेच वर्षभरात संघटकांच्या कार्याचे नियोजन करण्यात आले. संघटकांना साहित्यात  पोस्टर, पत्रक, महामानवाने विचारांचे पुस्तक, व्यसनमुक्ती वरील सापशिडी देण्यात आली.

यावेळी संघटक बैठकीचे उद्घाटन कल्याणयात्रा व वार्षिक कार्य अहवालच्या प्रदर्शनीचे नशाबंदी मंडळाचे अध्यक्ष माजी मुंबई विद्यापीठ कुलगुरू डॉ. राजन वेळूकर  यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास, मुख्य संघटक/ चिटणीस अमोल मडामे, चिटणीस चंद्रकांत चौधरी, सदस्य बॉस्को डिसुझा, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष वर्धा चे डॉ. नितिका व त्याची टिम हे उपस्थित होते. यावेळी ३६ जिल्ह्यातील संघटक, ६ विभाग प्रमुख, नशाबंदी मंडळाचे कार्यालय कर्मचारी उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात डॉ. राजन वेळूकर यांनी संस्था चालवतांना कशा पद्धतीने फंड गोळा केला पाहिजे त्यासाठी संस्थेचे प्रेझेंटेशन कसे असावे यावर मार्गदर्शन केले. तसेच नशाबंदी मंडळाच्या जिल्हा संघटक यांचे कौतुक केले त्यांना सूर्याची उपमा दिली. मंडळाला पुढील कार्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. सदर कार्यक्रमाची प्रस्तावना नशाबंदी मंडळाचे मुख्य संघटक  व चिटणीस अमोल स. भा. मडामे यांनी केले.

वर्षभरात आपल्या जिल्ह्यात विशेष कार्यकेल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर यांना गोल्डन मेडल देऊन तर नागपूर जिल्हा संघटक गौरव आळणे   यांना सिल्वर मेडल तर पालघर जिल्हा संघटक मिलिंद पाटील यांना ब्रान्स मेडल  देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी विभागीय संघटक प्रमुख म्हणून उत्तम काम केल्याबद्दल प्रथम क्रमांक पुणे विभाग प्रमुख ॲड. सुरेश सकटे, डॉ. बापुराव फडके, समीर गायकवाड, रजनिकांत  इंगळे व जगन्नाथ शिंदे यांना  सन्मानचिन्ह व रोख रक्कम तीन हजार रूपये तर दुसरा क्रमांक कोकण विभाग प्रमुख दिशा कळंबे व यांची टिम यांना सन्मानचिन्ह व रोख रक्कम दोन हजार रूपये  देऊन सन्मानित करण्यात आले.

डॉ. राजन वेळूकर  यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. त्यानंतर नशाबंदी मंडळाचे ३६ संघटकानी आपला परिचय देऊन विभाग प्रमुखांची निवड करण्यात आले. तसेच अहवाल लेखन, ऑनलाइन बैठकीविषयी सूचना तसेच कल्याण यात्रा विषयी सूचना मुख्य संघटक यांनी दिल्या. संघटकांना व्यसनमुक्तीची किती माहिती आहे? हे जाणून घेण्यासाठी बोल बच्चन हा खेळ सरचिटणीस यांनी घेतला.

दुसऱ्या दिवशी ६ जून रोजी रॅली कॉल ने दिवसाची सुरुवात झाली. त्यानंतर ३६  संघटकानी आपल्या जिल्ह्यांची ऐतिहासिक ओळख, व्यसनमुक्ती केंद्र, शाळा, कॉलेज, आश्रमशाळा, वसतिगृहे किती आहेत सांगुन जिल्ह्याचा परिचय देण्यास सांगण्यात आले. तसेच विभागानुसार बसून जिल्हा संघटक यांचे वार्षिक कार्यक्रम नियोजन करण्यात आले. त्याचबरोबर  प्रत्येक जिल्ह्यात किमान ३ शाळा व ३ कॉलेज  तंबाखूमुक्त करण्याचा व प्रत्येक जिल्ह्यात ड्रग्स फ्री जिल्हा अभियान राबवून नशा मुक्त भारत अभियानास अधिक बळ देण्याचा संकल्प करण्यात आला. संध्याकाळी सेवाग्राम आश्रम भेट व सर्व धर्म प्रार्थना मध्ये सहभाग घेतला  रात्री संघटक यांनी  पथनाट्य सादरीकरण करण्यात आले.

तिसऱ्या दिवशी म्हणजेच ७ जून रोजी, सकाळी नशाबंदी मंडळाचे कार्यकारी सदस्य बॉस्को डिसुझा यांनी नवीन अंमली पदार्थांची ओळख! या विषयावर मार्गदर्शन केले. तर नशाबंदी मंडळाचे कार्यकारी सदस्य सुजाता सावंत यांनी जिल्ह्यात फंड कशाप्रकारे उभा करता येईल या वर मार्गदर्शन केले. बैठक समारोप प्रसंगी जिल्हा परिषद वर्धा चे जिल्हा समाजकल्याण विभागाचे निरीक्षक राज मरापे यांनी भेट देऊन संघटकाचे कौतुक केले व सदिच्छा दिल्या. त्यांच्या हस्ते प्रत्येक संघटकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन शिबिराचा समारोप झाला.

या तीन दिवसीय बैठकीत जिल्हा संघटक पुणे डॉ. बापुराव बाबासाहेब फडके यांची पुणे विभागीय प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. *याप्रसंगी डॉ. बापुराव बाबासाहेब फडके यांनी जिल्ह्यात व्यसनमुक्तीचे कार्य अधिक जोमात होण्याकरता स्वतः प्रयत्नशील राहून तसेच प्रशासनाची मदत घेऊन, जनसामान्या सहभागी करून घेऊन व्यसनमुक्त पुणे जिल्हा निर्माण करण्याचा संकल्प केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *