स्मिता बाबरे ( मुख्य संपादिका )
लातूर : लातूर जिल्ह्यातील लपून-छपून चालणाऱ्या अवैध जुगार अड्ड्यांविरुद्ध कारवाईची मोहीम अधिक तीव्र करत स्थानिक गुन्हे शाखेने नावंदी (ता. उदगीर) येथे सुरू असलेल्या ‘तिर्रट’ जुगारावर धडक कारवाई केली. या कारवाईत जुगार खेळणाऱ्या ५ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, एकूण १५ लाख २ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान पोलिसांची चाहूल लागताच चार जण घटनास्थळावरून पसार झाले असून, त्यांचा शोध सुरू आहे.
दि. ०९ ऑगस्ट २०२६ रोजी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे सूचना व निर्देशांवर तसेच अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकाने वाढवना पोलीस ठाणे हद्दीतील नावंदी गावातील एका शेतातील चिंचेच्या झाडाखाली मोकळ्या जागेत काही जण ‘तिर्रट’ नावाचा जुगार खेळत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली.
मिळालेल्या माहितीची खातरजमा करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दुपारी सुमारे ३.०० वाजता अचानक छापा टाकला. यावेळी काही जण पोलिसांची चाहूल लागताच पळून गेले; मात्र ५ जण पोलिसांच्या हाती लागले आरोपींकडून जुगाराचे पत्ते, रोख रक्कम आणि मोबाईल फोन आढळून आले. तसेच जुगार खेळण्यासाठी ये-जा करण्यासाठी वापरण्यात आलेली वाहने देखील पोलिसांनी ताब्यात घेतली असून एकूण १५,०२,४००/- रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
खालील आरोपींनी ताब्यात घेण्यात आले आहे.
१) माधव भुजंग मोतेवाड (वय ४५), रा. सोमनाथपूर, उदगीर
२)आसीफ सिकंदर मजकुरी (वय २७), रा. लासूना, ता. देवणी, ह.मु. बनशेळकी रोड, उदगीर
३) सुदर्शनदेव मुलशंकर कापसे (वय २४), रा. नळगीर, ता. उदगीर
४)महेबुब युसुफ शेख (वय ३९), रा. नळगीर, ता. उदगीर
५)बालाजी गोविंदराव गुट्टे (वय ७२), रा. गुट्टेवाडी, ता. उदगीर
असे असून पोलिसाची चाहूल लागताच खालील आरोपी पळून गेले असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.
६) गणेश बालाजी पेदेवाड, रा. नळगीर, ता. उदगीर. (फरार)
७) अली हैदर बागवान, रा. बनशेळकी रोड, उदगीर. (फरार)
८)सदा राठोड, रा. सुल्लाळी तांडा, ता. जळकोट. (फरार)
९) बस्वराज ऊर्फ राजू मिंचे, रा. उदगीर . (फरार)
ही कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, पोलीस अंमलदार साहेबराव हाके, संजय कांबळे, रसूल पठाण, अर्जुन राजपूत, सूर्यकांत कलमे, मनोज खोसे, तुळशीराम बरुरे, पाराजी पुठेवाड, प्रेमदास राठोड व चंद्रकांत केंद्रे यांनी केली आहे.सदर प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, कलम १२(अ) अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली असून, पुढील तपास वाढवणा पोलीस ठाणे करीत आहे.
