स्मिता बाबरे ( मुख्य संपादिका )

भूम : धाराशिव जिल्ह्यातील भूम पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरोधात भूम पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत एकाचवेळी १० ठिकाणी विशेष ‘मास रेड’ मोहीम राबवली. या कारवाईत अवैध हातभट्टी दारू आणि दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे रसायन असा एकूण ८७५ लिटर मुद्देमाल जप्त करून घटनास्थळीच नष्ट करण्यात आला.

भूम पोलीस ठाण्याच्या पथकाने आरसोली, दिंडोरी, इंद्रानगर तसेच कल्याणनगर पारधी पिढी परिसरात एकाचवेळी धाडी टाकल्या. या कारवाईदरम्यान अवैध दारू व्यवसायात सहभागी असलेल्या संबंधित व्यक्तींवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed