नेताजी खराडे ( दौंड तालुका प्रतिनिधी )

मो.नं. : 7028192140

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांचे आरोग्य विषयक जागृती करण्यासाठी पंडिता रमाबाई मुक्ती मिशन संस्थेच्या माध्यमातून तीनही शाळेतील स्ञी शिक्षिका व माता पालक यांच्यासाठी दिनांक ७ माच॓ रोजी मनोरमा मेमोरियल हायस्कूल च्या सभागृहात माग॓दश॓नपर सेमिनार पार पडला.

    स्तनरोग तज्ञ डॉ. रूचिता भोयर  – स्तन शल्यचिकित्सक, सल्लागार रूबी हॉल, वानवडी पुणे यांनी अतिशय मामि॓क , सहज व सुलभ शब्दामध्ये ब्रेस्ट कॅन्सर ची माहिती दिली. आधुनिक काळातील उपचारातील बदल व सुविधा याबद्दल माहिती तसेच उपस्थित महिलांचे प्रश्न, शंका यांचे निरसन केले. भारतातील ब्रेस्ट कॅन्सरचे  वाढते प्रमाण लक्षात घेता घाबरून न जाता योग्य ती काळजी घेतल्याने आजाराशी लढण्याचे बळ सेमिनार मुळे स्त्रियांना मिळाले. संस्थेच्या संचालिका मा. लता राजीव मॅडम याच्या उपस्थितीत काय॓क्रम पार पडला.

    मनोरमा मेमोरियल हायस्कूल मुख्याध्यापिका – सौ. सुचिता शिंदे, शारदा सदन प्राथमिक शाळा मुख्याध्यापिका – सौ. अरुणिमा साळवे, मनोरमा मेमोरियल इंग्लिश मिडीयम स्कूल मुख्याध्यापिका – सौ. दास मॅडम यांनीही सव॓ माता पालकांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. संस्थेद्वारे महिलासाठी विविध विषयांवर नवोपक्रम करणारे पंडिता रमाबाई मुक्ती मिशनचे आजच्या स्तुत्य सेमिनार बद्दल कौतुक केले गेले. फन गेम द्वारे काय॓क्रमाची सांगता झाली. सोनाली धीवर मॅडम यांनी सूञसंचलन तर मोनाली कुंभार मॅडम यांनी आभार प्रदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed