( उत्तम तांबे , संपादक – रायगड जिल्हा )

माणगाव  : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे 2025 /26 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे .

या परीक्षेत माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे – अशोकदादा साबळे विद्यालयातील कुमारी – धैर्या धनराज बंडगर हिने इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत माणगाव तालुक्यामध्ये ७१ . ८१% टक्क्याने प्रथम क्रमांकाने यश प्राप्त केले . तसेच कु . सर्वेश अशोक सारूक या विद्यार्थ्याने ५६ . ६७ % टक्के मिळून इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षा पास झाल्याने त्यांच्या या दैदिप्यमान यशामुळे माणगाव शिक्षण प्रसारक मंडळामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे .

कु . धैर्या धनराज बंडगर व कु . सर्वेश अशोक सारूक या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याने या कर्तबगार , गुणवंत विद्यार्थ्यांचे माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष – राजीव साबळे , सेक्रेटरी – कृष्णा गांधी , स्कूल कमिटी चेअरमन – नरेंद्र गायकवाड , मुख्याध्यापक /प्राचार्य -दिलीप उभारे सर , उपप्राचार्य , पर्यवेक्षक ,शिक्षक प्रतिनिधी , शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी गौरवपूर्वक अभिनंदन केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed