उत्तम पां . तांबे ( संपादक – रायगड जिल्हा )
माणगाव ( रायगड जिल्हा ) : भारतरत्न – डॉ . बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन माणगाव येथे रविवार दिनांक १२ जुलै २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजता बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा माणगाव या विद्यमान समितीचे तालुका अध्यक्ष – रवींद्र मोरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षावास धम्म प्रवचन मालिका कार्यक्रमा संदर्भात सभा आयोजित करण्यात आली होती . सभेच्या प्रारंभी – बुद्ध वंदना ,त्रिशरण ग्रहण करून सभेला सुरुवात करण्यात आली .

तालुका शाखेचे चिटणीस – आर .डी . साळवी यांनी मागील इतिवृत्ताचे वाचन केल्यानंतर वर्षावास धम्म प्रवचन मालिकेच्या तिसऱ्या पर्वाचे नियोजन तसेच महाड क्रांती भूमी शतकपूर्ती सोहळ्यात बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा माणगाव आणि सर्व उपशाखांचे विशेष सहकार्य ,विविध उपशाखेतील भरणा ‘ सभासद मोहीम राबविणे , वेळेला महत्व देऊन सामाजिक कार्यक्रम वेळेत करण्याचा निर्धार , बौद्धजन पंचायत समिती दिनदर्शिका जाहिरात अशा विविध विषयांवर सदर सभेत महत्त्वपूर्ण विचार विनिमय करण्यात आला .

सदर सभेला तालुका सहचिटणीस – रणजीत मोहिते , खजिनदार – सुरेंद्र जाधव , माजी सहाय्यक गटविकास अधिकारी – महेंद्र गायकवाड , तालुका प्रसिद्धीप्रमुख – उत्तम तांबे , पत्रकार – विश्वास गायकवाड , विवेक जाधव ‘ अमोल मोहिते , संदेश साळवी , राजेश कासारे , प्रकाश मोरे , संदेश जाधव , रवींद्र गायकवाड , राजेश मोरे , मुकेश सकपाळ , मंगेश मोरे , अरविंद मोरे , बंडू मोरे ,दयाराम साळवी , सुनील उभारे , यशवंत गायकवाड , दीपक शिर्के या मान्यवरांसह आजी-माजी पदाधिकारी व सभासद बहुसंख्येने उपस्थित होते .
