नेताजी खराडे ( दौंड तालुका प्रतिनिधी )

मो.नं. : + 70281 92140

पुणे जिल्ह्यातील यवत (ता. दौंड) येथे एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गावात मटका अवैध धंद्याचे जाळे इतके घट्ट विणले गेले आहे की, ते थेट प्रशासनालाच आव्हान देत असल्याची चर्चा रंगत आहे.

विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, काही ठिकाणी गुप्तपणे चालणारे मटका अड्डे आता उघडपणे सुरू असून, रोज लाखोंची उलाढाल होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, या धंद्यामागे एक ‘मटका किंग’ कार्यरत असल्याची खळबळजनक चर्चा गावभर पसरली आहे.
तरुणाईला झपाट्याने या जाळ्यात ओढले जात असून, अनेक कुटुंबांची आर्थिक घडी विस्कटत असल्याचे वास्तव समोर येत आहे. “एकदा अडकल्यावर सुटका नाही,” अशी भीती व्यक्त करत काही नागरिकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर धक्कादायक माहिती दिली आहे.

सर्वात मोठा प्रश्न म्हणजे — एवढ्या मोठ्या प्रमाणावर सुरू असलेला हा अवैध धंदा पोलिसांच्या नजरेतून कसा सुटतोय? की यामागे कुणाचे तरी संरक्षण आहे?
या प्रश्नामुळे संपूर्ण परिसरात संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्यांनी इशारा दिला आहे की, “जर तात्काळ मोठी कारवाई झाली नाही, तर परिस्थिती हाताबाहेर जाईल आणि यवत गाव गुन्हेगारीचे केंद्र बनेल!”

यवत मध्ये सुरू असलेल्या या मटका साम्राज्यावर आता पोलिस प्रशासन काय कारवाई करते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed