नेताजी खराडे  ( क्राईम रिपोर्टर महाराष्ट्र राज्य )

मो.नं. : 70281 92140

दिनांक 27/03/2026 रोजी पोलीसांना खात्रीशीर माहिती मिळाली की, मौजे खामगाव ता. दौंड जि. पुणे येथील पाण्याच्या टाकीजवळील पत्र्याच्या शेडमध्ये एक इसम अवैधरित्या गांजा साठवून त्याची विक्री करीत आहे. त्यानुसार पोलीस निरीक्षक श्री. नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय कोल्हे, पोलीस उपनिरीक्षक अक्षय मोरे तसेच पोलीस अंमलदार व अंमली पदार्थ विरोधी पथक, कोल्हापूर परीक्षेत्र यांचे पथक, पंच व फॉरेन्सिक टीम यांच्या उपस्थितीत सदर ठिकाणी छापा टाकण्यात आला.
           सदर छापा कारवाई दरम्यान बातमी ठिकाणी एक इसम संशयास्पद स्थितीत आढळून आला. त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव आकाश अशोक मोहिते वय 23 वर्षे रा. खामगाव ता. दौंड जि. पुणे असे सांगितले. त्याची व त्याठिकाणची झडती घेतली असता त्याचेकडून व पत्र्याच्या शेडमधून एकूण 4,87,900/- रुपये किमतीचा अंदाजे 8 किलोपेक्षा जास्त वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ मिळून आला. सदर मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे.
            तपासादरम्यान आरोपी आकाश मोहिते याने सदर गांजा हा सागर उत्तम चव्हाण रा. खामगाव ता. दौंड जि. पुणे याचा असून त्याच्या सांगण्यावरून विक्रीसाठी ठेवलेला असल्याचे सांगितले आहे.त्यामुळे आरोपी नामे 1) आकाश अशोक मोहिते वय 23 वर्षे रा. खामगाव ता. दौंड जि. पुणे 2) सागर उत्तम चव्हाण रा. खामगाव ता. दौंड जि. पुणे यांचेविरुद्ध यवत पोलीस स्टेशन येथे एन.डी.पी.एस. कायदा कलम 8(क), 20(ब) तसेच बी.एन.एस. 2023 कलम 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
           सदर गुन्ह्यातील आरोपी आकाश अशोक मोहिते यास अटक करण्यात आलेली असून त्यास 31/3/26 पर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून, फरार आरोपी सागर उत्तम चव्हाण याचा शोध घेणे सुरू आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय कोल्हे हे करीत आहेत.
             सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक श्री. नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय कोल्हे, पोलीस उपनिरीक्षक अक्षय मोरे, पो.हवा/1929 गुरुनाथ गायकवाड, पो.हवा/1600 संदीप देवकर,पोहवा/2150 गणेश कुतवळ, पो.हवा/2242 दत्ता काळे, पो.हवा/2460 हिरालाल खोमणे तसेच अंमली पदार्थ विरोधी पथक, कोल्हापूर परीक्षेत्र यांचे अधिकारी व कर्मचारी यांनी यशस्वीरीत्या पार पाडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed