नेताजी खराडे ( दौंड तालुका प्रतिनिधी )

केडगाव : येथील खडकवासला पाटबंधारे शाखेचे शाखाधिकारी सिद्धार्थ शेवरे महिना महिनाभर शाखेत येत नसल्याने शाखा परिसरात अवैध धंदे वाढले असून तळीरामांना तर पिऊन निवांत पडण्याचे ठिकाणच भेटले आहे.
  

  “ज्या घराला वाली नाही ते घर वाऱ्यावर (रामभरोसे) असते” असे म्हणतात ते केडगावच्या पाटबंधारे शाखेला तंतोतंत लागू होते असेच म्हणावे लागेल. येथील शाखाधिकारी सिद्धार्थ शेवरे हेच महिना महिनाभर शाखेत येत नसल्याने शाखेत इतर कोणीच अधिकारी हजर राहत नाहीत. ते पण दांड्या मारून खुशाल फुकटचा पगार घेत आहेत. पाणीपट्टी भरायला आलेल्या शेतकऱ्यांचे यामुळे नुकसान होत असून वेळेत बिलं भरता न आल्याने हेच अधिकारी बिल थकीत दाखवून त्यांचे पाणी बंद करतात. अनेकदा केडगाव परिसरातील शेतकऱ्यांना लांब जाऊन इतर शाखेत भरणा करावा लागत आहे.
   

शाखेचे तर असे हाल आहेत त्यात केडगाव पाटबंधारे वसाहतीचे अजून वाईट हाल आहेत. येथे अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला असून अल्पवयीन मुलामुलींच्या लफड्यांना, अश्लील कृत्यांना ऊत आला आहे. गांजा फुकणारे, दारूडे यांना तर नशा करून आराम करण्यासाठी शांत आणि निवांत ठिकाण भेटले आहे. काळी जादू करणाऱ्यांचे उतारे टाकण्याचे स्थान झाले आहे. एवढे सगळे प्रकार होत असूनही वरिष्ठ अधिकारी मात्र शाखाधिकारी शेवरे यांची पाठराखण करताना दिसत आहेत. याबाबत प्रसिद्धी माध्यमांमधून आवाज उठविल्यास त्या पत्रकाराला सांगण्यात येते की मला फोन करत जाऊ नका
   

एकंदरीत, केडगाव पाटबंधारे शाखेत काय व्हायचं ते होऊ दे पण मी काही कामावर येणार नाही. माझा पगार मला सुरू आहे. माझं कोण काय वाकडं करणार ? अशीच काहीशी ताठर भूमिका खडकवासला केडगाव पाटबंधारे शाखेचे शाखाधिकारी सिद्धार्थ शेवरे यांची आहे का? अशी शंका नागरिकांमधून निर्माण केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *