नेताजी खराडे  ( क्राईम रिपोर्टर महाराष्ट्र राज्य )

मो.नं. :  70281 92140

दौंड :- पाटस येथील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याच्या बगॅसला सोमवारी (दि. ३०) सकाळी सुमारे सव्वा  दहा ते साडेदहाच्या दरम्यान अचानक आग लागल्याची घटना घडली. या भीषण आगीत बगॅस भरण्यासाठी उभा असलेला एक ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला.दोन अग्निशामक गाड्या आग विजवण्यासाठी उपलब्ध झाल्या आहेत..

मिळालेल्या माहितीनुसार, कारखान्याच्या परिसरातील बगॅस अचानक आग लागली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी काही क्षणांतच आगीने विकराळ रूप धारण केले. यावेळी घटनास्थळी उभा असलेला ट्रक आगीच्या विळख्यात सापडला आणि पाहता पाहता पूर्ण जळून खाक झाला.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी व संबंधित यंत्रणांनी तत्काळ धाव घेत आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र ट्रक पूर्ण पने जाळून खाक झाला आहे व बगॅस ही पूर्ण पणे जाळून खाक होत असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या आगीचे नेमके कारण काय, हे अजून समजले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed