अजित काळेल ( सातारा जि.संपादक )

सातारा : दि. ८ जून : प्राथमिक आरोग्य केंद्र कुमठे अंतर्गत उपकेंद्र पिलाणीवाडीच्या वतीने परमाळे येथे “माझे गाव आरोग्य संपन्न गाव” या उपक्रमांतर्गत आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात डोळ्यांची तपासणी, एनसीडी (असंसर्गजन्य रोग) तपासणी तसेच हिवताप व साथरोग जनजागृती अभियान राबविण्यात आले.

मेळाव्यात एकूण १८८ रुग्णांची तपासणी करण्यात आली. कार्यक्रमास सातारा जिल्हा परिषद सदस्य तथा जनआरोग्य समिती अध्यक्षा सौ. पुजाताई अमित मोरे, पंचायत समिती सदस्या सौ. प्रमिला सुतार, खरेदी-विक्री संघाचे संचालक सुरेंद्र देशपांडे, जनआरोग्य समितीचे सदस्य, परमाळे गावचे सरपंच, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर हजारे व डॉ. सुप्रिया बनकर यांच्यासह आशा व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

सर्व पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आरोग्य निरीक्षक अरविंद गोळे, सुधाकर बोधे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. किरण पवार व शुभम उंडाळे, आरोग्य सेवक राजेश पवार, सुरेंद्र लाड, प्रतापराव यादव, किरण जाधव, शुभम महाडिक, प्रमोद सावंत, प्रमोद डेंगळे, प्रथमेश मांडवेकर तसेच आरोग्य सेविका सुप्रिया कांबळे व सुप्रिया सोंडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमातील प्रमुख पाहुण्यांचे स्वागत आरोग्य सेविका नजराना बागवान यांनी केले. शेवटी उपस्थित सर्व पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *