नेताजी खराडे ( क्राईम रिपोर्टर )
मो.नं. : 70281 92140
दौंड : केडगाव येथील मजूर बेपत्ता; शोध घेण्याचे पोलिसांचे आवाहन
दौंड (केडगाव प्रतिनिधी) : दौंड तालुक्यातील केडगाव येथील शेंडगेवस्ती परिसरातील रहिवासी ज्ञानोबा शिवाजी मोरे (वय ५३) हे गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता झाले असून त्यांचा अद्याप कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात मिसिंग रजिस्टर क्रमांक ११०/२०२६ अन्वये नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानोबा मोरे हे मजुरीचे काम करतात. दिनांक २२ रोजी सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास ते घरातून बाहेर पडले. घरच्यांना त्यांनी “पुणे येथे कामावर जात आहे” असे सांगितले होते. मात्र त्यानंतर ते घरी परतले नाहीत. कुटुंबीयांनी नातेवाईक व परिचितांकडे चौकशी केली, तसेच विविध ठिकाणी शोध घेतला. तरीही त्यांचा कोणताही मागमूस लागला नसल्याने यवत पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली.
बेपत्ता व्यक्तीचे वर्णन असे की, त्यांची उंची सुमारे ५ फूट ८ इंच असून रंग निमगोरा आहे. अंगाने मध्यम बांधा, चेहरा गोल असून कपाळावर जुन्या जखमेची खूण आहे. बेपत्ता होताना त्यांच्या अंगात पांढऱ्या रंगाचा फुल शर्ट व रंगीत पँट होती. ते मराठी तसेच वडार भाषा बोलतात.
दरम्यान, सदर वर्णनाची व्यक्ती कोणाला कोठे आढळल्यास अथवा त्यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ यवत पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
संपर्क : पोलीस उपनिरीक्षक किशोर वाघज – ८८८८२५२५५५
पोलीस हवालदार ए. एम. काळे – ८४०८०६२५२०
