स्मिता बाबरे  मुख्य संपादिका

लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दि. 01ऑगस्ट 2026 पासून राबविण्यात येत असलेल्या ‘पोलीस-विद्यार्थी संवाद’ उपक्रमास विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमांतर्गत दि. 06 ऑगस्ट 2026 रोजी जिल्ह्यातील 07 शाळा-महाविद्यालयांना भेट देऊन एकूण 1,645 विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यात आला.

                   विद्यार्थ्यांमध्ये कायद्याविषयी जागरूकता निर्माण करणे, व्यसनमुक्त जीवनाचा संदेश देणे, सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण, सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणे आणि पोलिसांविषयी विश्वास दृढ करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

संवादादरम्यान विद्यार्थ्यांना ‘नशामुक्त भारत’ अभियान, नवीन फौजदारी कायदे, सायबर सुरक्षा व सायबर फसवणूक प्रतिबंध, एनडीपीएस कायदा, पॉक्सो कायदा, वाहतूक नियमांचे पालन, हेल्मेट व सीटबेल्ट वापरण्याचे महत्त्व, तसेच सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना पोलीस अधिकाऱ्यांनी समर्पक उत्तरे देत त्यांना कायद्याचे पालन करणारा जबाबदार नागरिक बनण्याचे आवाहन केले.

                    दि. 06 ऑगस्ट रोजी विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत खालीलप्रमाणे मार्गदर्शन करण्यात आले—

पोलीस स्टेशन लातूर ग्रामीण हद्दीत पोउपनि. श्री. वऱ्हाडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
पोलीस स्टेशन निलंगा हद्दीतील गोविंदराव नाईक विद्यालय, निलंगा येथे पोउपनि. श्री. साळुंखे यांनी मार्गदर्शन केले.
पोलीस स्टेशन कासार शिरशी हद्दीतील महाराष्ट्र विद्यालय, यकोटी (मुदगड) येथे सपोनि. श्री. गर्जे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

पोलीस स्टेशन उदगीर शहर हद्दीतील मातृभूमी विद्यालय, उदगीर येथे पोउपनि. श्री. केंद्रे यांनी मार्गदर्शन केले.
पोलीस स्टेशन अहमदपूर हद्दीत पोउपनि. श्रीमती माने यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
पोलीस स्टेशन वाडवणा हद्दीतील रामभाऊ महाळंगी आश्रम शाळा येथे पोउपनि. श्री. हलसे यांनी मार्गदर्शन केले.
पोलीस स्टेशन उदगीर ग्रामीण हद्दीतील टाईम पब्लिक स्कूल येथे पोउपनि. श्री. तिडके यांनी विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

                  या उपक्रमाचा पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे हे नियमित आढावा घेत असून, प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोलीस प्रशासनाचा सकारात्मक संदेश पोहोचावा, विद्यार्थ्यांमध्ये कायद्याबद्दल आदर निर्माण व्हावा, व्यसनमुक्त, सायबर सुरक्षित आणि जबाबदार नागरिक घडावेत यासाठी हा उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. ‘पोलीस-विद्यार्थी संवाद’ हा उपक्रम आगामी काळातही जिल्ह्यातील अधिकाधिक शाळा व महाविद्यालयांमध्ये सातत्याने राबविण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *