स्मिता बाबरे ( मुख्य संपादिका )

लातूर  : पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशांवर अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करण्याची मोहीम लातूर जिल्हा पोलीस दलाकडून प्रभावीपणे राबविण्यात येत असून त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात लातूर जिल्ह्यात अवैध दारू विक्री व वाहतुकीविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करून देशी दारूची विनापरवाना वाहतूक करणाऱ्या एका इसमास ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून देशी दारूच्या २,३०० बाटल्या व वाहतुकीसाठी वापरलेली आल्टो कार असा एकूण २ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

            दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ७.१० वाजता स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने मांजरा कारखाना ते चिंचोलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा लावून देशी दारूची वाहतूक करून अवैध विक्रीसाठी नेण्यात येत असलेल्या  एका आल्टो कार  आल्टो कार क्र. MH-24-C-7954 ला सकाळी ७.४० वाजता थांबवून चालकाची चौकशी केली असता त्याने आपले नाव

१) बालाजी प्रभाकर दुडलेवार (वय 43 वर्षे, रा. शर्मा नगर, औराद, ता. निलंगा, जि. लातूर; सध्या रा. महादेव नगर, 12 नंबर पाटी, लातूर)



           असे सांगितले वाहनाची झडती घेतली असता कारमध्ये खाकी रंगाचे २३ बॉक्स आढळून आले. प्रत्येक बॉक्समध्ये ९० एमएल क्षमतेच्या ‘सिमला संत्रा’ देशी दारूच्या १०० सिलबंद बाटल्या आढळल्या. अशाप्रकारे एकूण २,३०० बाटल्या, किंमत ९२,००० रुपये, तसेच दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली मारुती सुझुकी आल्टो कार, किंमत १,५०,००० रुपये, असा एकूण २,४२,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

                 सदर दारूची वाहतूक अथवा विक्री करण्याबाबत कोणताही वैध पास अथवा परवाना नसल्याचे आरोपीने सांगितल्याने त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार कलम 65(अ)(ई), 81 व 83 अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

                 ही कारवाई वरिष्ठांचे  मार्गदर्शनात  पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस अंमलदार  अर्जुनसिंग राजपूत, रियाज सौदागर, मनोज भारत खोसे, विजय पाटील, प्रविण कोळसुरे यांनी केली आहे.

                 लातूर जिल्ह्यात अवैध दारू विक्री, वाहतूक व इतर अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांची कारवाई यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असून, नागरिकांनी अशा अवैध व्यवसायांची माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करावे, असे आवाहन लातूर पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed