Author: adminclient

“वाचन संस्कृतीचा अनोखा उपक्रम — महेंद्र सरोदे सर यांच्या हस्ते दिवाळी अंकांचे वितरण”          गणेश कांबळे
फुरसुंगी (ता.हडपसर) येथे वाचन संस्कृती जोपासण्यासाठी एक आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते व शिक्षक महेंद्र सरोदे सर यांच्या पुढाकाराने दिवाळी अंक वाचकांना विनामूल्य वितरित करण्यात आले.

या उपक्रमाचा उद्देश समाजात वाचनाची आवड वाढवणे आणि साहित्यिक संस्कृती जपणे हा होता. दिवाळी अंक हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून विचारांना चालना देणारे, सामाजिक व साहित्यिक जाणिवा जागृत करणारे माध्यम आहेत.

या उपक्रमामुळे –

नवीन पिढीला दर्जेदार वाचनाची गोडी लागली,

स्थानिक लेखकांना प्रोत्साहन मिळाले,

आणि “वाचन हीच खरी संस्कृती” ही भावना सर्वांच्या मनात दृढ झाली.


कार्यक्रमास फुरसुंगी गावातील अनेक तरुण, विद्यार्थी आणि प्रौढ वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी या उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत केले व महेंद्र सरांच्या प्रयत्नांचे विशेष कौतुक केले.

“महेंद्र सरोदे सर” यांच्यासारख्या शिक्षकांनी घेतलेली अशी पुढाकार समाजाला वाचनाच्या दिशेने पुन्हा प्रवृत्त करते आणि संस्कारमय समाज निर्माण करण्यासाठी प्रेरणादायी ठरते.

बाजारमळा परिसरात घटना ; घरातील रोख रक्कम आणि सोन्याचांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले…

सुनिल थोरात लोणी काळभोर : दिवाळीनिमित्त सर्वजण मूळगावी गेल्याचा मोका साधून अज्ञात चोरट्यांनी बंद घरात घरफोडी करत रोख रकमेसह सुमारे चार लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना लोणी काळभोर (ता.…

फुलसावंगी एसटी बसस्टॉपची दुरवस्था – प्रवाशांची गैरसोय, अपघाताचा धोका वाढला!
       श्याम शिंदे
महागाव तालुका प्रतिनिधी

महागाव तालुक्यातील फुलसावंगी हे तालुक्यातील सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक केंद्र असून, येथील बाजारपेठेत दररोज शेकडो प्रवासी ये-जा करतात. मात्र, राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) फुलसावंगी येथील प्रवासी निवाऱ्याची दुरवस्था झाल्याने प्रवाशांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

स्थानिक नागरिक आणि प्रवाशांच्या मते, फुलसावंगी येथील एसटी प्रवासी निवारा व बस थांबा अत्यंत जीर्णावस्थेत असून, छप्पर तुटलेले, बसण्याची व्यवस्था नसलेली आणि परिसरात स्वच्छतेचा अभाव आहे. विशेष म्हणजे, अनेक वेळा बस या विरुद्ध दिशेने थांबत असल्याने अपघाताचा गंभीर धोका निर्माण होत आहे.

प्रवाशांचे म्हणणे आहे की, “एसटी बस नेहमी प्रवासी निवारापासून थोड्या अंतरावर किंवा उलट्या दिशेला थांबतात, त्यामुळे रस्ता ओलांडताना अपघाताची शक्यता वाढते. विशेषतः शालेय विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही परिस्थिती अत्यंत धोकादायक आहे.”

स्थानिक नागरिकांनी आणि प्रवाशांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडे लवकरात लवकर फुलसावंगी एसटी बस स्टॉपची दुरुस्ती करून प्रवासी निवाऱ्याची सुधारणा करण्याची मागणी केली आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, एसटी बस प्रवासी निवार्‍यासमोरच थांबावी, तसेच बसथांब्याची स्पष्ट निशाणी, बसण्याची सोय आणि सुरक्षित पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

जर ही मागणी लवकरात लवकर पूर्ण करण्यात आली नाही, तर प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होईल आणि प्रशासनावर कारवाईची मागणी केली जाईल, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गर्शना खाली आगामी होणाऱ्या निवडणूक आढावा बैठक संपन्न.

हारून शेख महाराष्ट्र प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री तसेच धाराशिव जिल्ह्याचे संपर्क मंत्री माननीय नामदार दत्तात्रय मामा भरणे यांच्या उपस्थितीत परिमल मंगल कार्यालय धाराशिव येथे नगर परिषद, जिल्हा परिषद आणि…

परतीच्या पावसाने पेण तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; भाताचं कोठार असलेला विभाग उध्वस्त

पेण रायगड – उपसंपादक संजय गायकवाड पेण तालुक्यातील खारेपाट विभागात परतीच्या पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर भात शेती केली जाते, परंतु गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या…

मुंबई–सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसला दौंड येथे थांबा मंजूर — आमदार राहुल कुल यांच्या पाठपुराव्याला यश

शिवाजी (आप्पा) पवार पुणे जिल्हा प्रतिनिधी :- केंद्रीय रेल्वेमंत्री मा.ना.श्री. अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन दौंड विधानसभा मतदारसंघातील विविध रेल्वे विषयक मागण्यांबाबत सविस्तर चर्चा आमदार राहुल कुल यांनी केली.या भेटीस…